Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. केंद्रावर आलेत ‘इतके’ भयंकर दिवस; पहा इंधन दरवाढीवर नेमके काय म्हटलेत मंत्री साहेब

दिल्ली : कोरोना पाठोपाठ देशातील जनता महागाईचा मार सहन करत आहे. इंधनाच्या वाढत्या किंमतीने तर नुसता उच्छाद मांडला आहे. काही राज्यात पेट्रोलने शंभरचा आकडा पार केला आहे. डिझेल सुद्धा त्याच दिशेने वाटचाल करत आहे. मात्र, सगळे दिसत असतानाही केंद्र सरकार नागरिकांना दिलासा देण्यासाठी काहीच करत नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील, असे लोकांना अजूनही वाटत आहे. मात्र, सध्या असे काहीच होणार नाही. इंधनाचे दर कमी होणार नसल्याचे संकेत खुद्द केंद्रीय मंत्र्यांनीच सांगितले आहे.

Advertisement

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आज गुजरातच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना इंधनाचे दर कमी होणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना मंत्री प्रधान म्हणाले, की सध्या सरकारचे उत्पन्न कमी झाले आहे, तर दुसरीकडे खर्च वाढला आहे. मागील आर्थिक वर्षात उत्पन्न कमी होते आणि २०२१-२२ या वर्षातही कमीच राहणार आहे. कोरोनाच्या संकटात आरोग्य क्षेत्रात सरकारचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढत असलेला खर्च आणि त्या तुलनेत कमी झालेले उत्पन्न पाहता इंधनाचे दर कमी करण्याची ही योग्य वेळ नाही. त्यांनी असे स्पष्ट केल्याने नजीकच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार नसल्याचे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. ७० डॉलर प्रति बॅरल दराने तेल खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे सुद्धा इंधनाच्या किमती वाढत असल्याचे प्रधान यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, एप्रिल महिन्यात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आता तर अशी वेळ येऊन ठेपली आहे, की काही राज्यात पेट्रोलने शंभरचा आकडा पार केला आहे. आज सुद्धा पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढ केली आहे. काही केल्या किमती कमी होत नाहीत. आणि आता तर खुद्द केंद्रीय मंत्र्यांनीच किमती कमी होणार नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता काही दिवस महागाईचा मार सहन करण्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नागरिकांसमोर राहिलेला नाही. खाद्यतेलांच्या दरात वाढ, डाळींच्या दरात वाढ तर होत आहेच. या दरवाढीतही काहीच दिलासा मिळालेला नाही. मध्यंतरी, खाद्यतेलांचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना काही सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याचा परिणाम अद्याप दिसलेला नाही. खाद्यतेलांच्या किमती कमी झालेल्या नाहीत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply