Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांना मिळेना घामाचे दाम, साखर कारखाने देईनात उसाचे पैसे, पहा किती रक्कम देणे आहे..?

पुणे : राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने (Sugar Factory) कर्जात बुडाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी दिलेल्या उसाचे पैसे देण्याचीही काही कारखान्याची स्थिती नाही. मात्र, त्यामुळे शेतकरीही अडचणीत आले आहेत. कारखान्याचे हंगाम संपूनही अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम दिलेले नाही.

Advertisement

राज्यात यंदा मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध असल्याने कारखान्यांचा हंगाम एप्रिलपर्यंत चालला. त्यातही पुणे व सोलापूर विभागांत मोठ्या प्रमाणात ऊस पीक निघाल्याने साखरेचे उत्पादनही वाढले. 2020-21 मध्ये राज्यात गाळप झालेल्या उसाचे ‘एफआरपी’प्रमाणे (FRP)कारखान्यांना 23 हजार 320 कोटी 57 लाख रुपये देणे होते. पैकी कारखान्यांनी 22 हजार 43 कोटी 13 लाख रुपये शेतकऱ्यांना अदा केले.

Advertisement

राज्यातील 117 साखर कारखान्यांनी 100 टक्के ‘एफआरपी’ दिली. तर 73 साखर कारखान्यांकडे ‘एफआरपी’ची 1277 कोटी 44 लाख रुपये थकीत होते. त्यापैकी 29 कारखान्यांकडेच शेतकऱ्यांचे तब्बल 913 कोटी रुपये देणे बाकी आहे. आता साखर आयुक्तांनी या कारखान्यांविरोधात साखर जप्तीची कारवाई केली आहे. एकूण ‘एफआरपी’ देण्याचे प्रमाण पाहिल्यास 50 टक्क्यांपेक्षा अधिक ‘एफआरपी’ दिलेले 68 कारखाने आहेत.

Loading...
Advertisement

‘एफआरपी’ देणारे कारखाने (टक्केवारी)
शून्य टक्के………………….. 1
1 ते 49 टक्के ……………….4
50 टक्क्यांपेक्षा अधिक…68
100 टक्के……………….. 117
एकूण…………………….. 190

Advertisement

सर्वांत कमी एफआरपी देणारे पाच कारखाने
पाणगेश्वर, लातूर – शून्य टक्के, किसनवीर खंडाळा – 5 टक्के, तासगाव शुगर – 26 टक्के, किसनवीर, भुईंज – 32 टक्के, भीमा टाकळी, सोलापूर – 43 टक्के.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply