Take a fresh look at your lifestyle.

`फ्रायडेफ्लेम’मध्ये डॉ. अमर्त्य सेन करणार फेसबुक लाइव्ह; पहा कुठे आहे ही पर्वणी

नाशिक : राष्ट्र सेवा दलाने बायोलॉजिकल आणि आयडियोलोजिकल करोनाच्या विरोधात `फ्रायडेफ्लेम’ #FridayFlame हे ऑनलाइन अभियान सुरू केलेले आहे. ७ मे २०२१ पासून सुरू असलेल्या या अभियानाचा समारोप ४ जून रोजी रात्री ८ वाजता होत आहे. त्यामध्ये नोबेल परितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. अमर्त्य सेन हे भारतीयांशी फेसबुक लाईव्ह या माध्यमातून संवाद साधणार आहेत.

Advertisement

डॉ. सेन हे आर्थिक संकट, जैविक आणि वैचारिक करोनाचे संकटाशी सामना कसा करायचा या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. महात्मा गांधी यांचे नातू प्रा. राजमोहन गांधी हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. राष्ट्र सेवा दलाचा स्थापना दिन (४ जून) हा निर्धार दिन म्हणून साजरा केला जात आहे. सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष व जागतिक कीर्तीचे भाषा तज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या निमंत्रणावरून हे दोन्ही दिग्गज देशाला संबोधित करणार आहेत. देशभरातील सेवादल व समविचारी चळवळीतील कार्यकर्ते, लेखक, कलावंत आणि पत्रकार या कार्यक्रमात सहभागी होतील.

Advertisement

लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा आणि बंधुता या संविधानिक मूल्यांशी कटिबद्धता राखत राष्ट्र सेवा दल काम करत आहे. कोविडमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या प्रती सहवेदना आणि फॅसिझम विरोधात लोकशाही निर्धार व्यक्त करण्यासाठी ४ जून रोजी देशभरातील कार्यकर्त्यांनी एक दिवसाचा उपवास करावा, असे आवाहन डॉ. गणेश देवी यांनी केले आहे. त्यात आतापर्यंत ११ हजार कार्यकर्त्यांनी नोंदणी केली आहे. सेवादलाचे राष्ट्रीय महासचिव अतुल देशमुख यांनी ही माहिती दिली.

Advertisement

मल्लिका साराभाई, नंदिता दास, इंदिरा जयसिंग, कन्हैया कुमार, अशोक वाजपेयी, रावसाहेब कसबे, सईदा हमीद, निखिल वागळे, डाॅ. झहीर काझी, नितिन वैद्य, एयर मार्शल मातेश्वरन, ओरदेता मेंडोंसा, कपिल पाटील आदींनी आजवरच्या फ्रायडेफ्लेम मध्ये हजेरी लावली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply