Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

लसटंचाई संपणार; ‘त्या’ लसही भारतात मिळणार, पहा नेमकी काय झालीय कार्यवाही

Please wait..

मुंबई : जगभरातील महत्वाच्या कंपनीच्या आणि जागतिक आरोग्य संघटनेकडूनही आपत्कालीन वापराची मंजुरी मिळालेल्या कोविड-19 लस भारतात मिळण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. त्यामुळे आता अमेरिकेतील फायझर व माॅडर्ना यांच्यासह अनेक इतर लस भारतात मिळण्याचा मार्ग खुला झालेला आहे. त्यामुळे देशातील लसटंचाईवर मात करणे शक्य होईल असे अनेकांना वाटत आहे.

Advertisement
Loading...

केंद्र सरकारने वेळोवेळी स्पष्ट केले आहे की, डिसेंबर 2021 पर्यंत सर्वांना लस देण्याचे नियोजन केले जात आहे. त्या अभियानातील हा एक महत्वाचा टप्पा मनाला जात आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध पुरवठा प्रशासन, ब्रिटनच्या ईएमए, ईके, एमएचअारए आणि जपानच्या पीएमडीएकडून मंजुरी िमळालेल्या लसींना आता भारतात चाचणी वा तपासणीची गरज आता उरलेली नाही. भारतीय ड्रग कंट्रोलर डीसीजीअायने याची घाेषणा केली आहे.

Advertisement
यामधील महत्वाचे मुद्दे असे :
लसला जागतिक आरोग्य संघटनेकडूनही आपत्कालीन वापराची मंजुरी मिळालेली असावी
भारतात तयार होणाऱ्या लसीच्या प्रत्येक बॅचच्या नमुन्यांची लॅबमध्ये पूर्वीप्रमाणेच तपासणी होत राहणार आहे
परदेशातून येणाऱ्या लसींना आता देशातील लॅबमध्ये तपासणीची गरज नाही
फक्त दस्तऐवज तपासून लसीकरणाची परवानगी मिळणार
भारतात तयार झालेल्या कोरोना लसीच्या प्रत्येक बॅचच्या नमुन्यांची तपासणी कसौली येथील सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीमध्ये होत राहणार
अमेरिकी कंपनी फायझर व माॅडर्नाच्या लसी भारतात येण्याचा मार्ग मोकळा

 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply