नवी दिल्ली : योगगुरु रामदेव बाबा आणि वाद, हे समीकरण काही आता नवे राहिलेले नाही. वादग्रस्त विधानांमुळे बाबा रामदेव सतत चर्चेत असतात. अॅलोपॅथीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे बाबा रामदेव नुकतेच आणखी एका नव्या वादात अडकले. हा वाद अजूनही शमलेला नाही.
पतंजली.. योगगुरू बाबा रामदेव यांची एफएमसीजी कंपनी. बाबा रामदेव यांच्या या कंपनीची यशोगाथा इतर व्यावसायिक यशोगाथांपेक्षा काहीसी वेगळी आहे. कारण, त्यांनी बाबा रामदेव यांनी आपलं साम्राज्य वाढविण्यासाठी ज्या पद्धतीने राजकारणाचा वापर केला, तसा फारच क्वचित कुणी केला असेल. 21व्या शतकात भारतात झपाट्यानं विस्तार झालेली ही कंपनी ठरली आहे. बाबा रामदेव यांची पतंजली आयुर्वेद (Patanjali Ayurveda net worth) ही कंपनी सध्या खोऱ्याने पैसा ओढत आहे.
2006 मध्ये बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी ‘पतंजली आयुर्वेद’ची स्थापना केली. सध्या आचार्य बाळकृष्ण यांचा या कंपनीत 99.6 टक्के हिस्सा आहे, परंतु बाबा रामदेव या कंपनीचे सह-संस्थापक आहेत. बाबा रामदेव हे ‘रुचि सोया’ कंपनीचे एक ‘नॉन-एक्झिक्युटिव्ह’ आणि ‘नॉन इंडीपेंडंट डायरेक्टर’ आहेत.
‘पतंजली’ने स्थापनेनंतर अतिशय वेगाने देशभर आपले भक्कम नेटवर्क उभे केले. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यावर, म्हणजेच 2014 ते 2017 या काळात ‘पतंजली’ने व्यवसायात अक्षरक्ष: गरुडझेप घेतली. 2015 व 2016 मध्ये ‘पतंजली’ची 100 टक्के वाढ झाली. देशात ‘एफएमसीजी’ क्षेत्रातील सर्व बहुराष्ट्रीय कंपन्यांना ‘पतंजली’ने धूळ चारली.
दरम्यान, 2017 नंतर मात्र ‘पतंजली’च्या व्यवसायाला काहीसी घरघर लागली. मोदी यांनी जाहीर केलेली नोटाबंदी आणि ‘जीएसटी’चा परिणाम ‘पतंजली’च्या व्यवसायावरही दिसून आला. शिवाय कंपनीचा विस्तार, धोरणे, उत्पादनातील त्रुटीमुळे लोकांचा ‘पतंजली’वरील विश्वास कमी झाल्याचे दिसून आले.
पतंजली आयुर्वेद आणि रुचि सोया (Ruchi Soya) या दोन्ही कंपन्यांची वार्षिक उलाढाल तब्बल 25 हजार कोटींची आहे. 2019-20 मध्ये ‘पतंजली’चे उत्पन्न आधीच्या वर्षाच्या तुलनेत 9.9 टक्क्यांनी वाढून 9 हजार 23 कोटी रुपये झाले. ‘बिझनेस इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म टॉफलर’च्या आकडेवारीनुसार, 2019-20 मध्ये पतंजली आयुर्वेदचा नफा 21 टक्क्यांनी वाढून 425 कोटी रुपये झाला. 2018-19 मध्ये या कंपनीला 349 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक| ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.