Take a fresh look at your lifestyle.

दुधाळ जनावरांच्या आहारात असावा ‘त्या’ घटकांचा समावेश; पहा नेमके काय म्हटलेय तज्ञांनी

सोलापूर : बरेली कृषी प्रतिष्ठान सोलापूर संचालित सोलापूरमधील कृषी विज्ञान केंद्रातर्फे जागतिक दूध दिनानिमित्त आयोजित ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना बरेली (उत्तर प्रदेश) येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ (पशु आहार) डॉ. सुनील जाधव यांनी महत्वाची माहिती सांगितली.

Advertisement

त्यांच्या माहितीमधील महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
  • दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादकतेत वाढ करावयाची असल्यास त्यांना संतुलित आहार देणे गरजेचे
  • ऊर्जा, प्रथिने देणारा आहार तसेच क्षार व जीवनसत्वे यांचे संतुलित प्रमाण असणे गरजेचे
  • त्यामुळे दुधाळ जनावरांचे आरोग्य उत्तम राहते, वंध्यत्वाची समस्या कमी होते
  • कमी खर्चात प्रथिनेयुक्त पौष्टिक चारा मिळण्यासाठी हिरव्या चाऱ्याचा वापर करावा
  • प्रति जनावर दोन ते पाच किलो हिरवा चारा आवश्यक असतो. यातून जीवनसत्व अ कॅरोटीन मिळते. सुका चारा प्रमाणातच देणे आवश्यक आहे

सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. लालासाहेब तांबडे, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी डॉ. सतीश डोईफोडे, पशुविज्ञानचे विशेषज्ञ डॉ. प्रकाश कदम, काळेगाव येथील सद्गुरू कृपा दूध संकलन केंद्राचे संचालक उमेश देशमुख आदि यावेळी उपस्थित होते. दूध हे पूर्ण-अन्न असून, दुग्ध व्यवसायात तंत्रज्ञानाचा अवलंब वाढवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे योगदान असून, पौष्टिक हिरव्या चाऱ्याबाबत केंद्राने जिल्ह्यात प्रचार व प्रसार केला असल्याचे डॉ. तांबडे यांनी म्हटले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply