मुंबई : पत्नी.. नवऱ्याच्या प्रत्येक सुख-दुःखात साथ देणारी जीवनसंगिणी.. लग्नाच्या वेळी प्रत्येक जण आपल्या पत्नीचे रक्षण करण्याचे वचन देतो. मात्र, आयुष्याची वाटचाल करताना पत्नीच नवऱ्याला अनेक संकटातून बाहेर काढत असते. संसाराचा गाडा ओढताना पै न् पैचा हिशेब घरातील ही लक्ष्मीच ठेवते. बचत करते. मात्र, आता तुम्हाला बायको आयकर वाचवण्यासाठीही (Income Tax Planning) मदत करु शकते. कशी..? ती तुम्हीच पाहा..
‘जॉईंट होमलोन’मधून मिळेल करात सवलत
आयुष्यात प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, ते आपलं हक्काचं घरटं. हे घरटं करण्यासाठी अनेकांना बॅंकांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र, घर खरेदी करताना तुम्ही ‘जॉईंट होमलोन’ (Joint Home loan) काढू शकता. त्यामुळे तुम्हाला करातही सवलत मिळू शकते.
कलम 80सी अंतर्गत पती-पत्नी दोघांनाही प्रत्येकी 1.5-1.5 लाख रुपयांची करात सवलत मिळते. सोबतच सेक्शन 24 (बी) अंतर्गत दोघांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची करसवलत, असा दुहेरी लाभ मिळतो.
आरोग्य विमाखरेदीतून लाभ
सध्या दवाखान्यांचा खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे अनेक जण स्वत:सह कुटुंबाचा आरोग्य विमा काढतोच. तुम्ही घरातील प्रत्येकासाठी वेगवेगळी विमा योजना घेऊ शकता किंवा एकत्र कौटुंबिक फ्लोटर योजना घेऊ शकता. जर तुम्ही पत्नी आणि मुलांचा आरोग्य विम्यात समावेश केल्यास, कलम 80 डी अंतर्गत तुम्हाला 25 हजार रुपयांपर्यंत करात सूट मिळू शकते.
एखादी जाॅंईंट विमा पॉलिसी घेतल्यास तुम्हाला कमी प्रीमियमवर अधिक फायदा होतो. त्याचबरोबर, कलम 80 सी अंतर्गत आयकरात सूटही मिळू शकतो.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक| ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.