Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

लसपुरवठ्यावर काँग्रेसने व्यक्त केला संशय; पहा नेमके कॅग ऑडिट करण्याची चिदंबरम यांची मागणी

दिल्ली : देश करोना संकटाचा सामना करत आहे, तर दुसरीकडे राजकारणी मंडळी राजकारणात मग्न आहेत. लसीकरणाच्या मुद्द्यावर सुरू असलेला वाद काही केल्या थांबायला तयार नाही. काँग्रेसकडून सरकारवर गंभीर आरोप केले जात आहेत. तसेच गैर भाजप शासित राज्यही केंद्र सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम सुरुवातीपासून सरकारवर टीका करत आहेत. आता तर पी. चिदंबरम यांनी लसीकरणाबाबत भाष्य केले आहे. देशातील लसींची टंचाई पाहता त्यांनी केंद्र सरकारला एक उपाय दिला आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Advertisement

याआधी भारत बायोटेक कंपनीने म्हटले होते, की लस पुरवठा आणि लसींचे उत्पादन ही एक किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे देशात कोवैक्सीन लसींची टंचाई दिसत आहे. याच मुद्द्यावर चिदंबरम यांनी भाष्य केले आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की ‘बेपत्ता करोना लसींचे रहस्य दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. लस निर्मितीसाठी आवश्यक ‘लीड टाइम’ बाबत भारत बायोटेक कंपनीच्या वक्तव्याने गोंधळ अधिकच वाढला आहे. ज्या दोन कंपन्यांनी लस निर्मिती केली आहे त्याची सविस्तर माहिती मिळणे आवश्यक वाटत आहे. याची माहिती एकदा मिळाली की मग कोणत्या दिवशी किती लसी कोणाला देण्यात आल्या, याची माहिती सुद्धा सरकारने दिली पाहिजे.’ ‘लस कंपन्यांची उत्पादन क्षमता, उत्पादन, पुरवठा आणि ग्राहकांची यादी यांचे कॅगद्वारे ऑडिट करणे योग्य ठरेल. लसींची कमतरता असल्याने आधीच नागरिकांत रोष वाढत आहे. याचा उद्रेक होण्याआधीच लसींचे काय गौडबंगाल आहे, याचे उत्तर मिळाले पाहिजे.’

Loading...
Advertisement

दरम्यान, चिदंबरम यांनी थेट चौकशीची मागणी केल्याने हा वाद वाढणार आहे. सध्या तरी सत्ताधारी भाजपने यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, भाजप काही म्हणणार नाही असेही नाही. त्यामुळे या मुद्द्यावर आरोप-प्रत्यारोप होत राहतील. एकूणच, लसींची टंचाई, लसीकरणातील गोंधळ, ऑक्सिजनची कमतरता यांसारख्या करोनाशी संबंधित मुद्द्यांवर विरोधकांनी आता भाजपची चांगलीच कोंडी केली आहे. भाजपही बॅकफूटवर दिसत आहे. विरोधकांच्या लक्षात आल्याने आता आधिक आक्रमकपणे टीका केली जात आहे. असे असले तरी सरकारकडून अजूनही परिस्थिती सांभाळण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याचे दिसत नाही. याबाबत नियोजन सुरू असल्याचे सरकारकडून सांगितले जात असले तरी कागदावरील नियोजन जोपर्यंत प्रत्यक्षात येत नाही, तोपर्यंत सरकारच्या अडचणी कमी होण्याची शक्यता दिसत नाही.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply