Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

डाळिंब मार्गदर्शन : तेल्या रोग झाल्यावर गडबडून जाऊ नका; पहा नेमके काय म्हटलेय कृषी विभागाने

Please wait..

अहमदनगर : जीवाणूजन्य करपा म्हणजे तेल्या रोग झाल्यावर शेतकऱ्यांनी अजिबात गडबडून जाऊ नये असे नगर तालुका तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांनी म्हटले आहे. तालुक्यातील अरणगाव (शिंदेवाडी), खंडाळा व बाबुर्डी घुमट येथील डाळिंब बागांची पाहणी करताना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी विभागाने हे आवाहन केले आहे.

Advertisement

तेल्या रोगाविषयी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना मंडल कृषी अधिकारी जगदीश तुंभारे, कृषी पर्यवेक्षक जालिंदर गांगुर्डे, कृषी सहाय्यक उमेश शेळके यांच्यासह डाळिंब उत्पादक शेतकरी किसनराव लोटके, गणेश शिंदे, बन्सी शिंदे, शरद टकले, विक्रम वाळके आदी उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलेले मुद्दे असे :

Advertisement
  • जैविक बुरशीनाशकांचा वापर केल्यास कमी खर्चात तेल्या रोग नियंत्रणात येईल.
  • हवामानातील बदल, ढगाळ वातावरण, हवेतील आर्द्रता यामुळे नवीन १ ते दीड वर्षे लागवड झालेल्या पिकावर या रोगाचा फांदी व खोडावर प्रार्दूभाव दिसून येतो.
  • डाळींबावरील विविध समस्यांपैकी तेल्या रोग (बॅक्टेरियल ब्लाईट) ही मोठी समस्या आहे. रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक रोग नियंत्रण पद्धतीचा वापर करावा.
  • डाळिंबावर बॅक्टेरियल ब्लाईट रोग (तेल्या) हा जिवाणूजन्य असून, झॅन्थोमोनास अक्झानोपोडीस पीव्ही पुनीकिया जीवाणूमुळे होतो.
  • याचा प्रादूर्भाव पाने, फुले, खोड व फळांवर होतो. सुरुवातीला पानावर लहान तेलकट किंवा पानथळ डाग दिसतात. उन्हात हे डाग बघितले की तेलासारखे चमकतात.
Loading...

तालुक्यात सुमारे ९५० हेक्टरवर, तर अरणगाव, खंडाळा व बाबुर्डी येथे सुमारे २०० एकरमध्ये डाळिंबाची लागवड करण्यात आलेली आहे. मागील १४ वर्षांपासून येथील शेतकरी डाळिंबाचे पिक घेत असून, ते अनुभवी आहेत. औषधांची फवारणी फळ काढणीच्या 30 दिवसापूर्वी व पावसाळी हंगामात ही फवारणी फळ काढणीच्या 20 दिवसांपूर्वी बंद करणे आवश्यक आहे, असे नवले यांनी म्हटलेले आहे.

Advertisement

रोगाची लक्षणे : याचा प्रादूर्भाव पाने, फुले, खोड व फळांवर होतो. सुरुवातीला पानावर लहान तेलकट किंवा पानथळ डाग दिसतात. उन्हात हे डाग बघितले की तेलासारखे चमकतात. फुलांवर व कळ्यांवर गर्द तपकिरी व काळपट डाग पडतात. पुढे यामुळे फुलांची व कळ्यांची गळ होते.  खोड व फांद्यांवर सुरुवातीला काळपट वा तेलकट डाग गोलाकार दिसतात. फळांवर सुरुवातीला एकदम लहान आकाराचे पानथळ तेलकट डाग दिसतात. कालांतराने हे डाग तपकिरी काळपट दिसून व त्यावर भेगा पडतात. फळांवर या डागांमुळे आडवे-उभे तडे जातात. तडे मोठे झाल्यावर फळे इतर कारणाने सडतात आणि गळून पडतात. जीवाणूंची वाढ 28 ते 32 अंश सेल्सिअस तापमान, तसेच वातावरणातील आर्द्रता 80%पेक्षा जास्त असल्यास झपाट्याने होते. बागेत किंवा बागेशेजारी तेलकट डाग रोगाचे अवशेष असणे. ढगाळ व पावसाळी हवामान, वादळी पाऊस व वातावरणातील आर्द्रता जास्त असणे. फळ हिरव्या रंगांच्या अवस्थेत असताना लवकर प्रादूर्भाव होतो. या बाबी रोगासाठी अनुकूल आहेत.

Advertisement

रोगाबाबत उपाययोजना : एकात्मिक रोग नियंत्रणासाठी बहार धरताना जमिनीवरील रोगट जीवाणूंची संख्या कमी करण्यासाठी ब्लिचिंग पावडर झाडाखाली भुकटी हेक्टरी 20 किलो धुरळावी. झाडाच्या फांद्या प्रादूर्भाव झालेल्या भागाच्या 2 इंच खालून छाटाव्यात. छाटणी करताना कात्री प्रत्येकवेळी 1% डेटॉलच्या द्रावणात निर्जंतुक करून घ्यावी. पानगळ व छाटणीनंतर बॅक्टेरियानाशक (500 पीपीएम)/ बोर्डोमिश्रण (1%) यांची फवारणी करावी. रोगाचा प्रादूर्भाव झाल्यास खालील 4 फवारण्या 5 दिवसांच्या अंतराने कराव्यात.

Advertisement
पहिली फवारणी : कॉपरहायड्रॉक्साईड 2 ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन 0.3 ग्रॅम + ब्रोनोपॉल 0.5 ग्रॅम + सर्फेक्टंट 0.5 मि.लि/लिटर
दुसरी : कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम + स्ट्रेप्टोमामसिन 0.3 ग्रॅम + ब्रोनोपॉल 0.5 ग्रॅम + सर्फेक्टंट 0.5 मि.लि/लिटर
तिसरी : कॉपर ऑक्झिक्लोराईड 2.5 ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन 0.3 ग्रॅम + ब्रोनोपॉल 0.5 ग्रॅम + सर्फेक्टंट 0.5 मि.लि/लिटर, चौथी – मँकोझेब (75%) 2 ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन 0.3 ग्रॅम + ब्रोनोपॉल 0.5 ग्रॅम + सर्फेक्टंट 0.5 मि.लि/लिटर

 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply