Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

हवाईउड्डाणाच्या स्वप्नांना झटका; सर्वसामान्यांचे विमान जमिनीवर, पहा काय निर्णय झालाय केंद्र सरकारचा

मुंबई : देशात वाढत चाललेल्या महागाईने आता विमान प्रवासालाही जोरदार झटका दिला आहे. त्यामुळे देशांतर्गत विमानाने प्रवास करायचा असेल तर जास्त पैसे मोजावे लागणार आहे. केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने याबाबत एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार विमान प्रवासाचे दर वाढवण्यात आले आहेत. नवीन दर १ जून पासून लागू होणार आहेत. देशात करोनाने हाहाकार उडाला आहे. असे एखादे क्षेत्र क्वचितच असेल की ज्याला करोनाचा फटका बसला नाही. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, काही निर्णय असे घेतले जात आहेत, की ज्यांचा त्रास महागाईने बेजार झालेल्या नागरिकांना होणार आहे. केंद्र सरकारने विमान प्रवासाबाबत आता जो निर्णय घेतला आहे त्याने सुद्धा विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्रासच होणार आहे.

Advertisement

याचे कारण म्हणजे, एक तर करोनाचा फटका बसल्याने देशातील विमान कंपन्यांची आर्थिक स्थिती सध्या चांगली नाही. महामारीच्या काळात विमानाने प्रवास कुणी करत नाही. त्यामुळे या कंपन्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या कंपन्यांना दिलासा देण्याच्या उद्देशानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार देशांतर्गत विमान प्रवासाचे भाडे १३ ते १६ टक्क्यांनी वाढवले आहे. साधारण ४० मिनीटांच्या प्रवासासाठी आता २ हजार ६०० रुपये मोजावे लागणार आहेत. याआधी २ हजार ३०० रुपये द्यावे लागत होते. ४० ते ६० मिनीटांच्या विमान प्रवासासाठी कमीत कमी ३ हजार ३०० रुपये द्यावे लागतील. याआधी २ हजार ९०० रुपये भाडे होते. अशाच पद्दतीने पुढील प्रवासाचे दर सुद्धा वाढवण्यात आले आहेत.

Loading...
Advertisement

करोना महामारीच्या काळात देशातील विमान कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही वाढत्या महागाईने हैराण केले आहे. खाद्यतेलांच्या किमतीने तर काही वर्षांचे रेकॉर्ड मोडले आहे. डाळी तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. इंधनाचे दरवाढही जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना आणखी संकटात ढकलले जात आहे. आता विमान प्रवासाचेही दर वाढवले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या करोनाच्या काळात कुणी जास्त प्रवास करत नाही. मात्र, करोना नियंत्रणात आल्यानंतर ज्यावेळी विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढेल, त्यावेळी नागरिकांना या दर वाढीचा फटका बसणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply