Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भाजीवरील चमचमीत तर्री विसरा आता.. खाद्यतेलाच्या किमतीचा भडका, पाहा कशामुळे झालीय दरवाढ..?

रोजच्या भाजीवरील चमचमीत तर्री दिसणे आता अवघड होणार आहे. कारण, सध्या खाद्यतेलाचे दर गगणाला भिडले आहेत. विशेषतः सूर्यफूलाच्या (Sunflowers) तेलाच्या (Oil) किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्या जोडीला बारीक मीठ, तांदूळ आणि मसूर डाळही आहेच. त्यांच्या किमतीतही 10 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

Advertisement

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर खाद्यतेलाच्या किमती अवलंबून असतात. त्यामुळे स्थानिक बाजारात तेलाच्या दरावर नियंत्रण ठेवता येत नाही. सध्या विविध ब्रँडच्या (Brand) सूर्यफूल तेलाच्या किमतीत 20 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तसेच बारीक मिठाची किमत 20 रुपयांवरून 22 रुपये, तर जुन्या तांदळाच्या किमतीत 45 वरून 55 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

Advertisement

खाद्यतेलाच्या किंमती वाढणार असल्याची कुणकुण लागताच बडे विक्रेते व पुरवठादार मोठ्या प्रमाणात साठेबाजी करतात. सरकारही त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. ग्राहकांना उच्चांकी दराने खाद्यतेल खरेदी करावे लागते आणि बड्या व्यापाऱ्यांचे उखळ पांढरे होते.

Advertisement

मसूर डाळीच्या किमतीत महिनाभरात 10 रुपयांनी वाढ झाली. लॉकडाऊनआधी 70 रुपये किलो असलेली मसूर डाळ आज 78 ते 80 रुपये किलो दराने विकली जात आहे. लॉकडाऊनमुळे वाहतूक खर्च, हमाली वाढल्याचे कारण देत घाऊक व्यापार्‍यांकडून दरवाढ करण्यात येत आहे.

Loading...
Advertisement

मे महिन्यात पाम तेलाची सरासरी किंमत 131.69 रुपये किलो झाली आहे. गेल्या 11 वर्षांतील ही उच्चांकी किंमत आहे. गतवर्षी मे महिन्यात पाम तेलाची किंमत 88.27 रुपये प्रतिकिलो होती.

Advertisement

खाद्यतेलाच्या किमती (प्रति किलो)

Advertisement
  • शेंगदाणे…….175.55 रुपये
  • वनस्पती……128.70 रुपये
  • सोयाबीन……148.27 रुपये
  • सूर्यफूल……. 169.54 रुपये
  • मोहरी……….164.44 रुपये
  • पाम………….131.69 रुपये

अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 10 वर्षांत देशातील सहा खाद्यतेलांच्या किंमती उच्चांकी पातळीवर पोचल्या आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात मोहरीच्या तेलाची किंमत प्रति किलो 118.25 रुपये होती. ती आता 164.44 रुपये किलोवर गेली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply