Take a fresh look at your lifestyle.

मुंबईला जो न्याय तोच इतर महापालिकांना देण्याची फडणवीस यांची मागणी; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

देशाची राजधानी मुंबई शहराची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लसींची गरज आहे. मात्र, पुरेशा लसी मिळत नसल्याने ग्लोबल टेंडर प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला होता.

मुंबई : करोनास आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात येत आहे. मात्र, लसींची कमतरता असल्याने लसीकरणात अडचणी येत आहेत. यासाठीच राज्य सरकारने ग्लोबल टेंडर काढले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेनेही असाच प्रयत्न केला. मुंबईतील नागरिकांना लसी मिळाव्यात, यासाठी ग्लोबल टेंडर काढले होते. या टेंडरला आठ पुरवठादारांनी प्रतिसाद मिळाला असून लवकरच लसी मिळणार आहे.

Advertisement

या मुद्द्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. लसींसाठी ज्या प्रकारे मुंबई महापालिकेस परवानगी देण्यात आली त्याच पद्धतीने राज्यातील अन्य मनपांनाही परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्यास परवानगी देण्याची मागणी काही मनपांनी राज्य सरकारकडे केली आहे. त्यामुळे जो न्याय मुंबईला दिला तोच न्याय पुणे, नागपूर, नाशिकला द्यावा. जर टेंडर काढण्याची परवानगी देता तर सर्वांनाच परवानगी मिळाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

करोना प्रतिबंधक लसींच्या मुद्द्यावर राज्ये आता आक्रमक होत आहेत. लसी मिळत नसल्याने केंद्राच्या लसीकरणाच्या धोरणावर कडाडून टीका करत आहेत. केंद्राच्या भरवशावर न राहता काही राज्यांनी ग्लोबल टेंडर प्रसिद्ध केले होते. मात्र, लस कंपन्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे राज्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. देशात लसींची कमतरता पाहता आता तरी केंद्र सरकारने लसीकरणाचे राष्ट्रीय धोरण ठरवावे आणि लसींची जबाबदारी घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, सरकारने असा कोणताच विचार केलेला नाही. केंद्र सरकार त्यांच्या पद्धतीने राज्यांना लस पुरवठा करत आहे.

Advertisement

केंद्र सरकारच्या या धोरणामुळे राज्यांना वेळेत लसी मिळत नाहीत. त्यामुळे नाईलाजाने ग्लोबल टेंडर काढावे लागले  होते. मात्र, यास प्रतिसाद मिळाला नाही. मुंबई मनपाने प्रसिद्ध केलेल्या टेंडरला मात्र प्रतिसाद मिळाला आहे. तसेच लसी देखील लवकरच मिळणार असल्याची माहिती आहे. असे झाले तर शहरातील लसीकरणातील अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. देशाची राजधानी मुंबई शहराची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लसींची गरज आहे. मात्र, पुरेशा लसी मिळत नसल्याने ग्लोबल टेंडर प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला होता.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply