Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अनलॉकबाबत होऊ शकते ‘ती’ कार्यवाही; पहा नेमके काय होऊ शकतात निर्णय

मुंबई :

Advertisement

राज्यात करोनाचे थैमान कमी होत असल्याने निर्बंध कमी करण्याचा विचार सुरू झाला आहे. राजकीय नेते, राज्य सरकारचे मंत्री यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या मुद्द्यावर आता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे. राज्यात कठोर निर्बंध राहणार की यामध्ये सवलत दिली जाणार याबाबत अजून तरी काहीच स्पष्ट नाही. राज्य सरकारनेही अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही. मात्र, तरीसुद्धा राज्य सरकारचे मंत्री यावर मत व्यक्त करत आहे. याआधी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लगेचच सर्वकाही सुरू होणार नाही. टप्प्याटप्प्याने निर्बंध कमी करावे लागतील. राज्यातील करोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले होते.

Advertisement

त्यानंतर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील लॉकडाउनबाबत महत्वाचे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन कमी करण्यात येईल. रेड झोनमधील गावांबाबत सध्या कोणताही धोका पत्करण्याची गरज नाही. राज्यात ज्या जिल्ह्यातील तालुक्यांत जास्त रुग्ण आहेत, तेथे निर्बंध कडक करावेत. ज्या तालुक्यात रुग्ण नाहीत तेथे सवलत द्यावी. उर्वरीत जिल्ह्यात मात्र टप्प्याटप्प्याने निर्बंध कमी करावेत, असा विचार सुरू आहे. राज्यात कठोर निर्बंधांचा सकारात्मक परिणाम दिसला आहे. निर्बंधांमुळे रुग्ण कमी झाले आहेत. करोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच पॉझिटिव्हिटी रेट घटला आहे. त्यामुळे आता निर्बंध हटवण्याची मागणी होत आहे. राज्य सरकारचाही तसा विचार असला तरी एकाच वेळी सर्व निर्बंध हटवले जाणार नाहीत, असे तरी सध्या दिसत आहे.

Loading...
Advertisement

लॉकडाउन मागे घेताना साधारण चार टप्प्यात निर्बंध कमी केले जातील असे सांगण्यात येत आहे. १ ते ७ जून दरम्यान टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप काहीच स्पष्ट नाही. आज होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात करोनाचा धोका अजून कायम आहे. त्यातच आता तिसऱ्या लाट येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे लॉकडाउनबाबत निर्णय घेताना याचाही विचार करावा लागणार आहे. देशातही अशीच परिस्थिती आहे. मात्र, रुग्णसंख्या कमी होत असल्याने काही राज्यांनी सवलती देण्यास सुरुवात केली आहे. वअशा परिस्थितीत राज्य सरकार नेमका काय निर्णय घेणार, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply