Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IMA-रामदेवबाबा यांचा वाद मोदींच्या कोर्टात; 1 हजार कोटींचा ठोकलाय दावा..!

दिल्ली : अॅलोपॅथी आणि अॅलोपॅथिक डॉक्टरांविषयी पतंजली समूहाचे सर्वेसर्वा स्वामी रामदेव यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीचे प्रकरण पेटले आहे. रामदेवबाबा यांनी १५ दिवसांत माफी मागावी, अन्यथा १,००० कोटी रुपयांची भरपाई देण्याची नोटीस इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पाठवली आहे. तर, योगगुरूंच्या विरोधात कट रचला जात असल्याचा आरोप रामदेवबाबा यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांनी केला आहे.

Advertisement

25 मुद्द्यांच्या पत्रासह अॅलोपॅथीला ‘मूर्खतापूर्ण विज्ञान’ म्हटल्याने रामदेवबाबा सध्या ट्रेंडमध्ये आहेत. बाबांनी याप्रकरणी माघार घेण्याचे सुतोवाच न करता जोरदार आव्हान उभे केल्याने आयएमएने कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबला आहे. त्यावर आता पुढे काय होणार याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, IMA ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र पाठवले आहे. त्यात कोरोनावरील उपचार आणि लसीकरणाबाबत दिशाभूल करणारी वक्तव्ये करणाऱ्या रामदेवबाबा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Loading...
Advertisement

अॅलोपॅथी सर्वगुणसंपन्न आहे तर मग या पॅथीचे डॉक्टर आजारी का पडतात, असा प्रश्न आचार्य बाळकृष्ण यांनी केला आहे. तर, पतंजली कंपनीच्या कोरोनिल किट या उत्पादनाची संभ्रमित करणारी जाहिरात हटवण्यासाठी आयएमए आग्रही आहे. त्यामुळे आता या वादाचा चेंडू थेट मोदींच्या कोर्टात असल्याने ते यावर कोणता तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply