Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

करोनापुढे रिअल इस्टेट सेक्टरही हतबल; पहा किती मोठ्या प्रमाणावर बसलाय गृहखरेदीला फटका

पुणे : करोनाने देशात किती संकटे आणली, याची यादी फार मोठी आहे. असे एखादेच क्षेत्र असेल की त्यास करोनाचा फटका बसला नसेल. देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान केले. उद्योग-व्यवसाय बंद पडले. गरीबी (poverty) आणि बेरोजगारीत (unemployment) वाढ झाली, ही यादी आताच संपणार नाही. यादी मोठीच आहे. त्यात आता रियल इस्टेटचीही (real estate sector) भर पडली आहे. लोकांच्या घर खरेदी करण्याच्या स्वप्नांचा या करोनाने अक्षरशः चुराडाच केला आहे. होय, हे खरे आहे.

Advertisement

रियल इस्टेटबाबतच्या एका अहवालातून हे सिद्ध झाले आहे. करोना काळात रियल इस्टेट क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. एडलवाइस रिसर्चच्या अहवालानुसार एप्रिलमध्ये सलग पाचव्या महिन्यात घरांच्या विक्रीत घट झाली आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात घरांची विक्री ६० टक्क्यांनी घटली आहे. तसेच नवीन गृहप्रकल्प सुरू करण्याचे धाडस बांधकाम व्यावसायिकांनी दाखवले नाही. त्यामुळे नवीन प्रकल्पातही ५३ टक्के घट दिसून आली आहे. मोठ्या आणि लहान शहरात दोन्ही ठिकाणी परिस्थिती सारखीच आहे. दक्षिण भारतात सुद्धा याचा परिणाम दिसून आला. हैदराबादमध्ये घरांच्या विक्रीत ४९ टक्के तर बंगळुरूमध्ये ५० टक्के घट झाली. तसेच मुंबई शहरात घरांच्या विक्रीत ६४ टक्के तर पुणे शहरात ६५ टक्के घट दिसून आली. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जवळपास ४ लाख २२ हजार घरांचे बांधकाम रखडले आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

Loading...
Advertisement

जगाचा विचार केला तर भारत देश वेगाने विकसित होत आहे. देशात शहरीकरण वाढत आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात रोजगाराच्या संधी जास्त आहेत. शिक्षणाच्या दृष्टीनेही नेहमी शहरांनाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे शिक्षण (education) आणि रोजगाराच्या (employment) निमित्ताने शहरात येणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सहाजिकच येथे घरांनाही मागणी असतेच. दरवर्षी लाखो लोक नवीन घरे खरेदी करतात. करोनाने मात्र जोरदार तडाखा दिला आहे. या काळात लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत. कंपन्यांनी पगार कपात (home loan issue) केली आहे. त्यामुळे पैशांची चणचण जाणवत आहे. घर खरेदी करण्याचा विचार आता सहसा कुणी करत नसल्याचे दिसून येत आहे. घरे घेण्याचा निर्णय लोकांनी पुढे ढकलला आहे. सध्याच्या परिस्थितीत ते ही बरोबरच आहे. याचा फटका मात्र घरांच्या विक्रीवर झाला आहे. देशात सगळीकडेच अशी परिस्थिती आहे. जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत घरांच्या विक्रीत वाढ होईल, असे म्हणणे धाडसाचेच ठरेल.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply