Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून झालेय १२ लाख कोटींचे नुकसान; पहा लॉकडाऊनचा कसा बसलाय फटका

मुंबई : करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध आहेत. मात्र, याचा मोठा फटका बसला असून राज्यातील व्यापाराचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. देशात सुद्धा अशीच परिस्थिती आहे. अनेक राज्यात लॉकडाउन असल्याने देशांतर्गत व्यापाराचे मोठे नुकसान झाले आहे.

Advertisement

औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र देशातील विकसित राज्य आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत राज्यात शहरीकरणाचा वेग जास्त आहे. मात्र, करोनाचा सर्वाधिक फटका राज्याला बसला आहे. करोनाच्या दोन्ही लाटांमध्ये राज्याचे मोठे नुकसान केले आहे. पहिल्या लाटेत केंद्र सरकारने देशव्यापी लॉकडाउन केला होता. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले. उद्योग-व्यवसाय बंद पडले. लाखो लोक बेरोजगार झाले. देशात गरीबी वाढली, यांसारख्या अनेक समस्या निर्माण झाल्या. हा अनुभव माहित असल्याने दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वेगाने वाढत असतानाही लॉकडाउन करण्याचे धाडस केंद्राने दाखवले नाही. राज्य सरकारांनाच उपाययोजना करण्यास सांगितले.

Advertisement

राज्य सरकारांनी मात्र कठोर निर्णय घेतले. त्यामुळे करोनास रोखण्यासाठी कुठे लॉकडाउन तर कुठे कठोर निर्बंध जाहीर करण्यात आले. राज्यांनी केलेल्या या उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसला आहे. करोनाची दुसरी लाट आता ओसरत आहे. रुग्णसंख्या सुद्धा कमी झाली आहे. दुसरीकडे मात्र, व्यापारास याचा मोठा फटका बसला. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतच व्यापाऱ्यांचे तब्बल ७२ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्याचा विचार केला तर या काळात राज्यातील व्यापाराचे जवळपास सव्वा लाख कोटी रुपये नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्याचा महसूल सुद्धा घटला आहे. करोनाची दुसरी लाट आता आटोक्यात येत असल्याने १ जून पासून व्यवसायास परवानगी देण्याची मागणी होत आहे.

Loading...
Advertisement

अखिल भारतीय व्यापारी महासंघाने देशातील नुकसानीचेही आकडे दिले आहे. संघटनेने याबाबत एक सर्वेक्षण केले होते. यामध्ये देशांतर्गत व्यापाराचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. देशात तब्बल १२ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे संघटनेने म्हटले आहे. दरम्यान, काही दिवसांपासून दुसऱ्या लाटेचा जोर कमी होत आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. पॉझिटिव्हिटी रेट घटला आहे. त्यामुळे परिस्थितीचा अंदाज घेत निर्बंधात सवलत देण्याचा विचार देशातील राज्य सरकारे करत आहेत. काही राज्यांनी निर्बंधांत सवलत देण्यास सुरुवातही केली आहे. तर काही राज्यांनी मात्र अद्याप निर्णय घेतलेला नाही.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply