Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

एलआयसी पाॅलिसी घेताना ‘ही’ काळजी न घेतल्यास खिसा होईल खाली, पाहा कशी होते फसवणूक..?

नवी दिल्ली : कोरोना काळात आरोग्य विम्याच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. कोरोनामुळे सध्या अनेक जण पॉलिसी काढत आहेत. मात्र, कोणतीही पॉलिसी घेताना पुरेपूर काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा कुणीही चालता-बोलता गंडा घालू शकतो. याबाबत स्वतः भारतीय आयुर्विमा मंडळाने (LIC) नागरिकांना सूचित केले आहे.

Advertisement

काही दिवसांपूर्वी बँकेच्या ग्राहकांची फसवणुक करण्याचे प्रकार होत होते. आता भामट्यांनी LIC ग्राहकांना लक्ष्य केलं आहे. एलआयसी अधिकारी किंवा विमा नियामक IRDAI अधिकारी असल्याचा बनाव करुन हे भामटे ग्राहकांना फोन करतात. त्यानंतर काही क्षणात त्यांचं खातं खाली करतात.

Advertisement

‘एलआयसी’ने याबाबत ग्राहकांना अलर्ट केलं आहे. त्यात म्हटलं आहे, की कंपनी कोणतीही पॉलिसी सरेंडर करण्याबाबत ग्राहकांना सूचवत नाही. ग्राहकांनी अशा प्रकारचे फोन ‘अटेंड’ करू नये. एलआयसीची कोणतीही पाॅलिसी घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर पॉलिसी रजिस्टर करावी आणि त्या ठिकाणीच सर्व माहिती घ्यावी, असे आवाहन एलआयसीने केले आहे.

Loading...
Advertisement

काय काळजी घ्याल..?

Advertisement
  • पॉलिसीसंदर्भात कोणत्याही माहितीसाठी एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटलाच http://www.licindia.in भेट द्यावी. कोणत्याही क्रमांकावर फोन करून पॉलिसीसंदर्भात माहिती मिळवू नका.
  • बनावट कॉल आल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करा, शिवाय spuriouscalls@licindia.com यावरही तक्रार नोंदवू शकता.
  • ‘आयआरडीए’द्वारे जारी करण्यात आलेला परवाना, किंवा एलआयसीने दिलेले ओळखपत्र असेल, अशाच एजंटकडून पॉलिसी खरेदी करा.
  • कोणताही दिशाभूल करणारा कॉल आल्यास co_crm_fb@licindia यावर ईमेल करून तक्रार करू शकता.
  • एलआयसीच्या वेबसाइटवरील तक्रार निवारण अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.
  • वैयक्तिक आणि पॉलिसीसंदर्भातील माहिती कुणाशीही शेअर करू नका.
  • पॉलिसी सरेंडर करण्यासंदर्भातही कुणालाही माहिती देऊ नका.

ग्राहकांनी अशा फेक फोन कॉल्सबाबत सावध राहणं आवश्यक आहे. एलआयसी पॉलिसीची चुकीची माहिती देऊन काही जण ग्राहकांना फसवित आहेत. गेल्या काही दिवसांपासून पॉलिसीची रक्कम त्वरित मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply