Modi Government: आगामी 5 राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन मोदी सरकारने मोठा निर्णय घेत युनिफाइड पेन्शन योजना लागू केली आहे. ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. याचा फायदा तब्बल 23 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे.
मात्र या पूर्वी लागू असलेल्या नॅशनल पेन्शन स्कीम आणि ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये आणि युनिफाइड पेन्शन योजनेमध्ये काय फरक आहे याची माहिती जाणून घेऊया.
UPS योजनेत केंद्रीय कर्मचाऱ्यांना फिक्स पेन्शन मिळणार आहे. युनिफाइड पेन्शन योजनेत केंद्रीय कर्मचाऱ्यांना फिक्स पेन्शन मिळणार. जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 25 वर्षे काम केले असेल, तर निवृत्तीपूर्वी नोकरीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या किमान 50 टक्के रक्कम पेन्शन मिळणार. जर एखाद्या निवृत्तीवेतनधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला कर्मचाऱ्याच्या मृत्यूपर्यंत मिळालेल्या पेन्शनपैकी 60 टक्के रक्कम मिळेल अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.
NPS योजना
राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच NPS मध्ये कर्मचारी आणि सरकारने केलेल्या योगदानावर कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातून 10 टक्के आणि सरकारकडून 14 टक्के या योजनेत योगदान करण्यात येतो. तर UPS मध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान 10 टक्केच राहणार असून सरकारी योगदान 14 टक्केवरून 18.5 टक्के होणार आहे.
NPS एक बाजाराशी संबंधित योजना असल्याने यामध्ये पेन्शनची रक्कम निश्चित करण्यात आलेली नाही. 1 जानेवारी 2004 किंवा त्यानंतर केंद्र सरकारमध्ये सामील होणारे सशस्त्र दल कर्मचारी वगळता सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी NPS लागू आहे तसेच ही योजना खाजगी कर्मचाऱ्यांना देखील लागू होते.
OPS योजना
ओल्ड पेन्शन योजना म्हणजेच OPS मध्ये सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या 50 टक्के रक्कम मासिक पेन्शन म्हणून देण्यात येते . या योजनेमध्ये डीएच्या दरांमध्ये वाढ झाली तर मासिक पेन्शन वाढत असते.
या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर जास्तीत जास्त 20 लाख रुपयांची ग्रॅच्युइटी मिळते. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पेन्शनचा लाभ मिळतो.