Modi Government: आनंदाची बातमी! ‘या’ अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी होणार, सरकारचा निर्णय

Modi Government:  दिवसेंदिवस वाढणाऱ्या या महागाईत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत सामान्यांना दिलासा दिला आहे. पेनकिलर आणि अँटिबायोटिक्ससह 70 अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांसाठी अनेक आजारांवर उपचार स्वस्त होणार आहेत. देशातील कोट्यवधी लोक विविध रोगांवर उपचार करण्यासाठी वेदनाशामक औषधांपासून प्रतिजैविकांपर्यंत औषधे खरेदी करतात. अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी झाल्याने देशातील करोडो लोकांना थेट फायदा होणार आहे.

नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत अनेक जीवनावश्यक औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारने या आठवड्यात NPPA बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अधिकृत सूचना केली.

 एनपीपीए देशात विकल्या जाणाऱ्या अत्यावश्यक औषधांच्या किमती नियंत्रित करते, ज्यांचा वापर सामान्य लोक किंवा बहुतेक लोक विविध रोगांवर उपचार करण्यासाठी करतात. या बैठकीत 70 औषधी आणि 4 विशेष औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पानंतर सुमारे दोन आठवड्यांनंतर सरकारचा हा निर्णय आला आहे.

ही औषधे स्वस्त होणार 

या बैठकीत NPPA ने 70 औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला. यात वेदनाशामक, ताप, अँटीबायोटिक्स, स्नायू दुखणे, संसर्ग, अतिसार, रक्तदाब (बीपी), मधुमेह आणि हृदयरोगासह अनेक जीवनशैली रोगांचा समावेश होतो. याशिवाय 4 विशेष फॉर्म्युलेशनसह औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. औषधांच्या किमती परवडण्याजोग्या करण्याच्या दिशेने सरकारने पुढाकार घेणे अपेक्षित होते.

सरकारने जून 2024 मध्ये अनेक आवश्यक औषधांच्या किमतीही कमी केल्या होत्या. जूनमध्ये झालेल्या 124 व्या बैठकीत NPPA ने सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या 54 औषधे आणि 8 विशेष औषधांच्या किमती कमी केल्या होत्या. सरकारने गेल्या महिन्यात अँटीबायोटिक्स, मल्टी व्हिटॅमिन, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित औषधांच्या किमतीही कमी केल्या होत्या. याशिवाय कॅन्सरसारख्या आजारांवर उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधेही स्वस्त करण्यात आली.

Leave a Comment