Modi Government: पुन्हा मोदी सरकार! ‘या’ दिवशी होणार शपथविधी

Modi Government: लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशातील राजकीय परिस्थिती बदलल्याने भाजपला तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी आता एनडीएमधील घटक पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

यामुळेच काल 05 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एनडीएमधील सर्व घटक पक्षांची बैठक पार पाडली आहे. या बैठकीमध्ये एनडीएने नरेंद्र मोदी यांना संसदीय नेते म्हणून पसंती दर्शवली आहे.

तर आता समोर आलेल्या माहितीनुसार, 07 जून एनडीएचे सर्व निवडून आलेल्या खासदारांसोबत बैठक करून पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा राष्ट्रपतीकडे सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहे आणि 08 जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे.

तर दुसरीकडे इंडिया आघाडी देखील सरकार स्थापन करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आम्ही योग्य वेळी योग्य पाऊल उचलू अशी माहिती माध्यमांना दिली. यामुळे इंडिया आघाडी सरकार स्थापन करणार की नाही याबाबतचा अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएला 293 तर इंडिया आघाडीला 240 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपने 240 जागा जिंकले असून काँगेसने 99 जागा जिंकले आहे.

Leave a Comment