NDA Government: मोदींच्या शपथविधीला ‘या’ देशांचे पाहुणे लावणार हजेरी

NDA Government: लोकसभा निवडणुकीत एनडीएला तिसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पुन्हा एकदा एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली आहे.

एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी नरेंद्र मोदी निवड झाल्यानंतर मोदींनी राष्ट्रपतीकडे सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. यानंतर आता नरेंद्र मोदी 09 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. या कार्यक्रमाला अनेक देशांतील पाहुणेही उपस्थित राहणार आहेत.

नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश आणि मॉरिशसच्या राष्ट्राध्यक्षांसह भूतानच्या पंतप्रधानांनाही एनडीएने आमंत्रित केल्याचे वृत्त आहे. या सर्व देशांकडून पाहुणे अपेक्षित आहेत. देशातील अनेक विरोधी पक्षांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

कोणत्या देशांच्या नेत्यांचा समावेश असेल ते जाणून घ्या

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशच्या अध्यक्षा शेख हसीना नरेंद्र मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शेजारी राष्ट्र नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड आणि भूतानचे राजा शेरिंग तोग्बे उपस्थित राहणार आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना त्यांच्या शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

त्यांनी नरेंद्र मोदींना फोन करून एनडीएच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. नरेंद्र मोदी यांनी शेख हसीना यांच्याशी फोनवर बोलून त्यांना त्यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. यासोबतच शेख हसीना यांनीही त्यांचे निमंत्रण स्वीकारले आहे. भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ आणि नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

एनडीएला पूर्ण बहुमत

4 जून रोजी झालेल्या 18व्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला 292 जागांसह पूर्ण बहुमत मिळाले. यावेळी भाजपला मोठा फटाका बसला असून पक्षाला फक्त 240 जागा जिंकता आले आहे.

यामुळे एनडीएच्या घटक पक्षांच्या एकजुटीने नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत अनेक मंत्रीही मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. 

Leave a Comment