Modi Government : देशातील विविध भागात मागच्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक खरी खरीप पिके उध्वस्त झाली आहे. यामुळे शेतकऱ्याच्या अडचणीत भर पडली आहे.
तर दुसरीकडे देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार राबवत असणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित एक मोठा अपडेट समोर आला आहे. या अपडेटनुसार लवकरच केंद्र सरकार शेतकऱ्यांचे खात्यात पैसे जमा करणार आहे.
सरकार आता किसान निधी योजनेचा 14वा हप्ता खात्यात वर्ग करणार आहे, याची चर्चा जोरात सुरू आहे. आतापर्यंत, सरकारने या योजनेशी संबंधित लोकांच्या खात्यावर 2,000 रुपयांचे 13 हप्ते पाठवले आहेत. हप्त्याचे पैसे पाठवण्याची तारीख सरकारने अधिकृतपणे जाहीर केली आहे
पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी
केंद्र सरकारद्वारे चालवल्या जात असलेल्या लोककल्याणकारी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील म्हणजे 14 वा हप्ता खात्यावर पाठवला जाणार आहे. यासाठी सरकारने 28 जुलै 2023 ही तारीख निश्चित केली आहे. पीएम मोदी राजस्थानमधील शेतकऱ्यांना संबोधित करून योजनेचे पैसे खात्यात ट्रान्सफर करणार आहेत.
या कार्यक्रमात सुमारे 3 लाख शेतकरी सहभागी होणार असून, हा राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वीचा मोठा संदेशही मानला जात आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, सरकार प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वार्षिक 6,000 रुपये हस्तांतरित करते. दर चार महिन्यांनी हप्त्याचे पैसे खात्यात जमा केले जातात.
या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत
पीएम किसान सन्मान निधीमध्ये सुमारे 9 कोटी लोकांना पैसे हस्तांतरित केले जाणार आहेत, ज्यासाठी 18,000 कोटी रुपयांचे बजेट करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसीचे काम पूर्ण केले आहे त्यांनाच हप्त्याची रक्कम दिली जाईल.