दिल्ली – मोदी सरकारला (Modi government) 8 वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव भाजप (BJP) सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या स्वरूपात साजरा करणार आहे. भाजपने दोन पातळ्यांवर प्रचाराचा निर्णय घेतला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J.P. Nadda) यांनी संपूर्ण देशात बूथ स्तरापर्यंत 8 वर्षांची सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण कार्यक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रिपोर्ट टू नेशन या कार्यक्रमाअंतर्गत ही पुस्तिका प्रकाशित केली जाणार आहे. 30 मे रोजी या पुस्तिकेचे राष्ट्रीय स्तरावर प्रमुख नेते प्रकाशन करतील. 31 मे आणि 1 जून रोजी या पुस्तिकेचे राज्यस्तरावर प्रकाशन होणार आहे.
75 तास लोक-केंद्रित क्रियाकलाप
सर्व लोकप्रतिनिधी 1 जून ते 14 जून या कालावधीत 75 तासांचा जनसंपर्क आयोजित करतील, ज्यामध्ये लाभार्थ्यांशी संवाद साधला जाईल.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
विकास बाईक रॅली
बाबासाहेब विश्वास रॅली आणि बिरसा मुंडा विश्वास रॅली काढण्यात येणार आहे. बिरसा मुंडा आदिवासी विश्वास रॅली आणि मेळा 3 जून ते 5 जून या कालावधीत आयोजित केला जाईल.
कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांच्या गृहभेटी असतील
आदीवासी युवतींच्या संपर्काचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. 2 आणि 3 जून रोजी देशभरात विविध स्तरावर पत्रकार परिषदा आयोजित केल्या जाणार आहेत. केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे प्रमुख नेते याचे आयोजन करतील. बिरसा मुंडा आदिवासी विश्वास रॅली आणि मेळा 3 जून ते 5 जून या कालावधीत आयोजित केला जाईल. 6 ते 8 जून या कालावधीत पक्ष अल्पसंख्याकांशी विविध पातळ्यांवर चर्चा घडवून आणणार आहे. 7 जून ते 13 जून या कालावधीत पक्ष विकास तीर्थ बाइक रॅली काढणार आहे. यासोबतच 1 जून ते 13 जून या कालावधीत पक्षातर्फे विविध स्तरावर बाबासाहेब विश्वास रॅली आणि चौपाल सभांचे आयोजन करण्यात येणार आहे.