Narendra Modi: खूब मलाई खाओ हे काँग्रेस ध्येय, चंद्रपूरमध्ये मोदींकडून काँग्रेसवर जोरदार टीका

Narendra Modi: राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून प्रचाराची सुरुवात झाली आहे. स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर मधून या प्रचाराची सुरुवात केली आहे. त्यांनी महायुतीचे उमेदवार सुधीर मुंगटीवार यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली.

या जाहीर सभेमध्ये त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत काँग्रेस पक्षाला कारलेची उपमा दिली आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्याचा विकास नाही तर स्वत:चा आणि स्वत:च्या कुटुंबियांच्या विकासासाठी काम केलं.

मविआ सरकारच्या काळात फक्त कमिशन आणि मलाई खाण्याचं काम झालं, त्यांनी राज्यातील अनेक विकासकामांना ब्रेक लावला. असं देखील मोदी म्हणाले.

तर विदर्भाच्या विकासासाठी मी ज्या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण केलं त्यालाही या लोकांनी विरोध केला होता.

चंद्रपुराकडून एवढा मोठा स्नेह मिळणं माझ्यासाठी विशेष येथील नागरिकांनी पुन्हा एकदा मोदी सरकार हे ठरवलं आहे.

लोकसभा निवडणूक ही स्थिरता आणि अस्थिरता यांच्यातील निवडणूक आहे.

देशासाठी कठोर आणि मोठे निर्णय घेणे हेच भाजप आणि एनडीएचं ध्येय तर, जहां भी सत्ता पाओ, खूब मलाई खाओ हे काँग्रेस आणि INDI चं ध्येय असल्याचं सांगितले.

कडू कारले, साखरेत तळले तरीही कडू ते कडूच असते. हा वाक्यप्रचार कॉंग्रेसला लागू होतो असं देखील आपल्या भाषणात मोदी म्हणाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.

Leave a Comment