Health Report Update: प्लॅस्टिक आता शरीरात विरघळत असल्याच्या बातम्या अनेकवेळा समोर आल्या आहेत. शरीराच्या अनेक भागांमध्ये मायक्रोप्लास्टिक्स (Microplastic)सापडल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याचबरोबर आपण खात असलेल्या पदार्थातही भरपूर प्रमाणात प्लास्टिक असल्याचे आढळून आले आहे. आपल्या शरीरात दररोज प्लास्टिक जात असल्याबद्दल अनेक अहवाल आले आहेत, ज्यावरून आपण दररोज किती प्लास्टिक खातो हे तो अहवाल सांगतो. पण, आता मायक्रोप्लास्टिकवर आणखी एक अहवाल समोर आला आहे, जो खरोखरच भीतीदायक आहे. वास्तविक, आता असे समोर आले आहे की, जी आई आपल्या मुलांना स्तनपानाद्वारे (breastfeeding) अन्न भरवते त्यातही प्लास्टिकचा समावेश असल्याचे आढळून आले आहे.
होय, आता आईचे दूधही (Mother Milk) शुद्ध नाही. आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिक असल्याचे प्रथमच समोर आले आहे. चला तर मग जाणून घेऊया काय सांगतो हा रिपोर्ट. तसेच जाणून घ्या, याआधीही मायक्रोप्लास्टिक शरीरात जात असल्याची कोणती माहिती समोर आली आहे.
नवीनतम अहवाल काय सांगतो
डी डब्ल्यू च्या मते, पहिल्यांदाच महिलांच्या स्तनातील दुधात मायक्रोप्लास्टिक आढळले आहे. याचा बालकांवर होणाऱ्या संभाव्य आरोग्यावरील परिणामांबद्दल शास्त्रज्ञ खूप चिंतित आहेत. इटालियन शास्त्रज्ञांनी प्लास्टिक पॅकेजिंग आणि सीफूड तसेच प्लास्टिक असलेल्या वैयक्तिक स्वच्छता उत्पादनांच्या वापरामध्ये मातांच्या अन्नाच्या वापराची नोंद केली आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, वातावरणात सर्वत्र मायक्रोप्लास्टिक्स असतात.
या अहवालात असे म्हटले आहे की लहान मुले रासायनिक पदार्थांबाबत (chemical substances) विशेषतः संवेदनशील असतात. त्यामुळे अश्या विषयावर पुढील अभ्यासाची तातडीने गरज आहे. मात्र तरीही आईचे दूध हेच मुलासाठी सर्वोत्तम असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले आहे.
काय केले पाहिजे?
शास्त्रज्ञांनी गर्भवती महिलांना गर्भधारणेदरम्यान प्लास्टिकच्या डब्यात ठेवलेले अन्न न खाण्याचा इशारा दिला आहे. वास्तविक या अन्नामध्ये प्लास्टिकचे कण असतात. विशेष म्हणजे गरोदर महिलांनी सीफूड (Seafood) आणि दुधाचे (Milk) सेवन करताना काळजी घ्यावी असे यावेळी संशोधकांकडून सांगण्यात आले आहे.
- Must Read:
- Health Tips: अधिकचे वजन वा लठ्ठपणा असेल तर होऊ शकतात हे गंभीर परिणाम; पहा सविस्तर
- Agriculture News: लम्पी त्वचारोगाचा धोका कधी संपणार; पशुपालकांना लागली आहे चिंता
- Cricket Update: या महिला क्रिकेटरचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा धमाका, दिग्गजांच्या क्लबमध्ये सामील
मायक्रोप्लास्टिक किती धोकादायक आहे
मायक्रोप्लास्टिक्स पाच मिलिमीटरपेक्षा कमी जाडीचे असतात आणि ते महासागर, पर्वत आणि हवेत मुबलक प्रमाणात असतात. हे मोठ्या प्लास्टिकच्या ढिगाऱ्यापासून तयार होतात, जे बऱ्याच लहान तुकड्यांमध्ये तुटतात. आता ते फुफ्फुसातही (lungs) सापडल्याचा अहवाल समोर आला आहे. शरीरात आढळणाऱ्या प्लास्टिकमध्ये पॉलीप्रोपीलीन (Polypropylene) आणि पीईटी म्हणजेच पॉलीथिलीन टेरेफ्थालेट (Polyethylene terephthalate) यांचा समावेश होतो. यापूर्वी हे प्लास्टिक रक्तात सापडले होते आणि त्यावर बरेच संशोधन झाले होते आणि ते अत्यंत चिंताजनक मानले जात होते. एका अहवालानुसार असे मानले जाते की, आपण १० दिवसांत एका क्रेडिट कार्डच्या बरोबरीचे प्लास्टिक खात असतो. त्यामुळे हवा, पाणी आणि अन्नासोबत प्लास्टिकही शरीरात पोहोचत आहे. आणि हे आपल्या सर्वांसाठी खूप घातक ठरू शकते.