MG Cloud EV : नवीन एमजी क्लाउड ईव्ही देणार टाटा नेक्सॉन ईव्हीला टक्कर, मिळेल 450 किमी रेंज; जाणून घ्या किंमत

MG Cloud EV : बाजारात नुकतीच MG Cloud EV लाँच झाली आहे. विशेष म्हणजे या कारमध्ये 450 किलोमीटर पर्यंतची रेंज मिळेल. कंपनीची नवीन कार टाटा नेक्सॉन ईव्हीला टक्कर देईल. या कारमध्ये तुम्हाला अनेक शानदार फीचर्स पाहायला मिळतील.

बॅटरी आणि रेंज

रिपोर्ट्सनुसार, नवीन MG Cloud EV मध्ये 50 kWh ची बॅटरी असेल जी पूर्ण चार्ज केली तर हि कार 450 किलोमीटर पर्यंतची रेंज देईल. हे 134 एचपी पॉवर मिळवण्याची शक्यता आहे. किमतीचा विचार केला तर भारतात या मॉडेलची किंमत 20 लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते. यामध्ये तुम्हाला अनेक प्रकार मिळतील.

MG Cloud EV चे डिझाइन आणि फीचर्स

हे लक्षात घ्या की नवीन MG Cloud EV चे डिझाईन त्याचा प्लस पॉइंट ठरणार आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीची काही छायाचित्रे आधीच उपलब्ध झाली असून असे सांगण्यात येत आहे की कंपनी भारतात देखील त्याच डिझाइनचे अनुसरण करू शकते.

कार समोरून खूप सुंदर दिसते. तर त्याच्या समोर स्टायलिश ग्रिल दिले आहे. त्याच्या इंटिरिअरमध्येही तुम्हाला अनेक चांगले फीचर्स पाहायला मिळू शकतात. ड्युअल झोन एसी, डिजिटल मीटर कन्सोल, मागील एसी व्हेंट्स, एअर प्युरिफायर आणि हवेशीर आसन यांसारखी वैशिष्ट्ये तुम्हाला पाहायला मिळतील.

कारची लांबी सुमारे 4.3 मीटर असू शकते, ज्यामुळे मेट्रो शहरात वाहन चालविणे सोपे होते. याला 2700 मिमी चा व्हीलबेस मिळण्याची शक्यता आहे. आता लांब व्हीलबेसमुळे केबिन आरामदायी राहून जागाही चांगली आहे. MG भारतीय मॉडेलचे सस्पेंशन आणि टायरचा आकार बदलण्याची शक्यता आहे. ते भारतीय रस्त्यांनुसार बसवले जातील.

Leave a Comment