MG Astor Hybrid Plus: तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन कार खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये MG नवीन कार लॉन्च करण्याची तयारी करत आहे. या कारमध्ये हायब्रीड सिस्टम मिळणार आहे. माहितीनुसार, कंपनी लवकरच MG Astor Hybrid Plus या नावाने नवीन कार भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करणार आहे.
MG Astor Hybrid Plus डिझाइन
माहितीनुसार, MG Astor Hybrid Plus चे डिझाईन देखील अतिशय आकर्षक आहे. कारच्या फ्रंटला स्लिम हेडलाइट्स आणि एक मोठी ग्रील आहे जी तिला आधुनिक आणि स्टाइलिश लुक देते. कारच्या रीयरमध्ये नवीन टेललाइट्स आणि अलॉय व्हील देखील आहेत. कारमध्ये अनेक ॲडव्हान्स फीचर्स पाहायला मिळतात. कारचा लुक आणि डिझाईन देखील प्रभावी आहे.
MG Astor Hybrid Plus इंजिन
कारमध्ये एक पॉवरफुल हायब्रीड सिस्टम दिसत आहे. जे पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरसह काम करते आणि हे खूप छान तंत्रज्ञान आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे कारला अधिक मायलेज मिळून ती प्रदूषणमुक्त होऊ शकते. कारचे इंजिन ॲटकिन्सन सायकलवर चालते ज्यामुळे ते अधिक इंधन कार्यक्षम बनते. म्हणजे, जर तुम्ही लांबचा प्रवास केला. तर ही कार तुमच्यासाठी सर्वात बेस्ट ठरू शकते.
MG Astor Hybrid Plus इंटीरियर
कारचे इंटीरियर देखील खूपच भारी असणार आहे. कारमध्ये एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे जी तुम्हाला नेव्हिगेशन, म्युझिक आणि इतर फीचर्स प्रदान करते. कारमध्ये पुरेशी जागा देखील आहे ज्यामुळे तुम्ही आणि तुमचे कुटुंब आरामात प्रवास करू शकता.
MG Astor Hybrid Plus किंमत
MG Astor Hybrid Plus ची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु या कारची किंमत जवळपास 16.61 लाख रुपये असू शकते. कारची किंमत सध्याच्या MG Astor पेक्षा थोडी जास्त असेल. ही कार लवकरच भारतात लॉन्च होणार आहे.