Memory Improve Tips : आपले जीवन चांगले ठेवण्यासाठी मेंदूच्या आरोग्याची काळजी (Brain Health) घेणे सुद्धा (Memory Improve Tips) अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देणे शक्य होत नाही. खाण्यापिण्याच्या वेळा पाळल्या जात नाहीत. फास्टफूडच्या सेवनाचे प्रमाण (Fast Food) वाढत चालले आहे. यामुळे मानवी आरोग्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आजारांमध्ये वाढ होत आहे. काही जणांना स्मरणशक्ती क्षीण होण्याचाही (Memory Loss) त्रास जाणवू लागला आहे.
निष्काळजीपणामुळे लहान वयातच लोकांची स्मरणशक्ती कमजोर होत असल्याचेही दिसून आले आहे. एक काळ असा होता जेव्हा कमकुवत स्मरणशक्ती लोकांच्या वयाशी जोडली जात होती. परंतु आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. आजकाल वृद्धांबरोबरच तरुणांची स्मरणशक्ती सुद्धा कमी होऊ लागली आहे. खरंतर ही काळजीची बाब म्हणावी लागेल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमची स्मरणशक्ती तल्लख ठेवू शकता.
Memory Improve Tips
न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार सामान्यतः असे मानले जाते, की स्मरणशक्ती वाढविण्यासाठी दररोज सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे. चांगली झोप घेतल्याने स्मरणशक्ती दीर्घकालीन राहते. तथापि अमेरिकन न्यूरो सायंटिस्ट रेचेल समर्स यांचे मत आहे की स्मरणशक्ती तीक्ष्ण होण्यासाठी लोकांनी आठ ते दहा तासांची झोप घेणे आवश्यक आहे.
स्मरणशक्ती सुधारण्यासाठी दैनंदिन व्यायामही केला पाहिजे. विशेषतः एरोबिक व्यायाम करणे स्मरणशक्तीसाठी खूप चांगले मानले जाते. एरोबिक व्यायाम केल्याने तरुण आणि वयस्कर अशा दोघांच्याही स्मरणशक्त वाढ होते. व्यायाम करणे, स्विमिंग करणे, धावणे, चालणे यामुळे मेंदूला रक्तपुरवठा सुधारतो मेंदूच्या कार्यास यामुळे मदत मिळते.
पुरेशी झोप आणि व्यायाम केल्यानंतर स्मरणशक्ती वाढविण्याचा तिसरा सर्वोत्तम मार्ग म्हणजे माइंड फुलनेस. माईंड फुलनेस म्हणजे आरामात बसून तुमच्या मनावर आणि शरीरावर लक्ष केंद्रित करण्याचा सराव. प्रीफ्रंटल कार्टेक्सची जाडी वाढवण्यासाठी माईंड फुलनेस अनेक अभ्यासांमध्ये दर्शविला गेला आहे. मेंदूचा हा भाग लक्ष आणि स्मरणशक्तीशी संबंधित आहे. हा सराव स्मरणशक्तीसाठी खूप फायदेशीर आहे.
Worst Foods For Brain : सावधान! चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, मेंदूला पोहोचेल हानी
Memory Improve Tips
मेंदूला चालना देणाऱ्या घडामोडी केल्याने तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण होऊ शकते. तुमच्या मेंदूला आव्हान देणाऱ्या या क्रिया आहेत. नवीन भाषा शिकणे किंवा एखादे वाद्य वाजवण्याचा प्रयत्न करणे यांसारख्या क्रियाकलापांमुळे स्मरणशक्ती सुधारते. या क्रिया मेंदूला उत्तेजित करतात आणि नवीन न्यूरल कनेक्शनच्या वाढीस प्रोत्साहन देतात. याचा स्मरणशक्तीवर सकारात्मक परिणाम होतो, असे अनेक अभ्यासातून दिसून आले आहे.
स्मरणशक्तीत वाढ करण्यासाठी भूतकाळातील गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आजकाल प्रत्येकाला काहीही लक्षात ठेवायचे नसते आणि प्रत्येक संभाषणासाठी आपण गुगलचा (Google) वापर करतो. यामुळे मेंदूचे श्रम जरी कमी होत असले तरी त्याचा दीर्घकालीन फायदा मात्र होत नाही. प्रत्येक गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून ठेवण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. तुम्ही गुगल न वापरता तुमची स्मरणशक्तीचा वापर करून तुम्ही आधी वाचलेल्या किंवा पाहिलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा सराव केला पाहिजे. असे केल्याने तुमची स्मृती आणि ज्ञानात वाढ होते.