Melasma treatment with home remediesटवटवीत चेहरा हवाय का? स्वयंपाकघरातच आहेत उपाय

टवटवीत चेहरा हवाय का? स्वयंपाकघरातच आहेत उपाय

Measma treatment with home remedies हजारो रूपयांचे कपडे घाला, नव्या ट्रेंडची फॅशन करा, हटके स्टाइलने लक्ष वेधून घ्या. पण चेहऱ्यावर तेज नसेल तर सौंदर्य खुलून येत नाही. त्यात महिलांना तर चेहरा टवटवीत दिसावा असे नेहमीच वाटत असते. पण गरोदरपण, प्रसूती यानंतर महिलांमध्ये होणाऱ्या हार्मोन्स बदलांमुळे (harmons problem solution) चेहऱ्यावर काळे डाग दिसायला लागतात. वाढत्या वयातही गाल, नाक याठिकाणी तपकिरी डाग दिसतात. ते डाग घालवण्यासाठी सुरू होतो अनेक उपायांचा शोध. या डागांनाच वांग (melasma symptoms ) असं म्हणतात. चेहरा टवटवीत दिसण्यासाठीचे उपाय महिलांच्या हाताशी म्हणजे स्वयंपाकघरातच आहेत. त्यामुळे हे घरगुती उपाय नक्कीच चेहऱ्यावर ग्लो आणू शकतात.

कच्चा बटाटा हा वांगावर अतिशय गुणकारी (Melasma treatment)आहे. बटाट्याच्या फोडीवर पाण्याचे थेंब टाकून तो वांग असलेल्या भागावर लावून दहा मिनिटांनी कोमट पाण्याने धुतल्यास एका महिन्यातच फरक दिसतो. वांगामुळे चेहरा काळवंडला असेल तर मध आणि कोरफड  यांचे मिश्रणही फायदेशीर ठरते. हे मिश्रण चेहऱ्यावर २० मिनिटे लावून चेहरा धुवून टाका. दोन महिन्यात चेहरा तजेलदार झाल्याशिवाय राहणार नाही. वांगपासून सुटका हवी असेल तर दही रामबाण उपाय करते. ताजं दही वांगावर रोज लावून सुकल्यानंतर धुवून टाकले तर काही दिवसातच चेहऱ्यावर चमक येते. व्हिटॅमिन सी युक्त लिंबाचा रस वांगाच्या समस्येवर उत्तम उपाय आहे. एक चमचा लिंबाचा रस (lemon remedies) आणि मध एकत्र करून हा पॅक लावला तर वांगाचे डाग निघून जातात. मात्र हे उपाय आठवड्यातून किमान दोन वेळा तरी केले पाहिजेत.

वांगाची सुरूवात दिसायला लागली की महिलाच नव्हे तर पुरूषांनाही त्यांच्या चेहऱ्याची काळजी वाटायला लागते. पण आठवड्यातून दोन दिवस जर तुम्ही स्वयंपाकघरातील नेहमीच पदार्थ वापरून उपाय केले तर तजेलदार वांगविरहीत त्वचा मिळवायला वेळ लागणार नाही.

Leave a Comment