Megha Engineering ने महाराष्ट्रात ‘तो’ प्रोजेक्ट मिळवण्यासाठी खरेदी केले 140 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड ? अनेक चर्चांना उधाण

Megha Engineering :  देशात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेल्या इलेक्टोरल बाँड्स प्रकरणात आता अनेक मोठे आणि धक्कादायक खुलासे होत आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, मेघा ग्रुप हा इलेक्टोरल बाँड्सच्या सर्वात मोठ्या खरेदीदारांपैकी एक आहे.

या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने राज्यातील ठाणे-बोरिवली ट्विन टनेल प्रोजेक्टपूर्वी कोट्यवधींचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले होते. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीने 14,400 कोटी रुपयांच्या ठाणे-बोरिवली ट्विन टनेल प्रोजेक्टसाठी निविदा जिंकण्याच्या एक महिना अगोदर 11 एप्रिल 2023 रोजी 140 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले होते.

Facebook-Instagram वापरण्यासाठी द्यावे लागणार पैसे, मेटाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

प्रोजेक्टपूर्वी कंपनीने 821 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले होते

मेघा इंजिनिअरिंगची स्थापना 1989 साली झाली. या कंपनीने सुमारे 821 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले होते.

मेघा ग्रुपला प्रोजेक्ट मिळाला

महाराष्ट्र सरकारच्या मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) त्याच वर्षी जानेवारीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत दोन रस्ते बोगद्याच्या प्रकल्पासाठी निविदा काढली होती. मेघा ग्रुपनेच त्यासाठी बोली लावली होती. या कंपनीलाच प्रकल्प मिळाला होता.

भाजपला ‘या’ 10 जणांनी दिले भरघोस देणगी, नाव जाणून व्हाल थक्क

एल अँड टी ग्रुपला प्रकल्प मिळाला नाही

एल अँड टी ग्रुपनेही या कंपनीसाठी बोली लावली होती. त्याची बोली फेटाळण्यात आली. तो फेटाळण्याबाबत गटाने दोन याचिका दाखल केल्या होत्या. एमएमआरडीएने न्यायालयात सांगितले होते की, बोलीनंतर झालेल्या चुका दुरुस्त करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही.

Leave a Comment