Meat Shops : ‘सागा दावा’ या शुभ महिन्यामुळे सिक्कीम राज्यात 4 जूनपर्यंत सर्व मांसाची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय सिक्कीम सरकारने घेतला आहे.
धर्मशास्त्र विभागाने सांगितले की, सिक्कीममधील ‘सागा दावा’ पाहता 27 मे ते 4 जून दरम्यान मांसाची दुकाने बंद राहणार आहे.
विभागाच्या अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की केवळ विवाह समारंभ, सामाजिक कार्ये आणि प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना खाद्य देण्याच्या संदर्भात अपरिहार्य परिस्थितीतच बाहेरून मांस आयात करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. त्यासाठी आदेश देणाऱ्यांना विभागाची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. तथापि, माशांच्या दुकानांना कोणत्याही निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
धार्मिक भावनांचा आदर करत या काळात मासळी विक्री न करणेच योग्य ठरेल, असे अधिसूचनेत म्हटले आहे. अधिसूचनेनुसार, आदेशाचे उल्लंघन करणार्यांना 1,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल.