नेपाळमध्ये MDH आणि Everest मसाल्यांवर बंदी, ‘हे’ आहे कारण

MDH And Everest Band In Nepal : सिंगापूर आणि हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही मोठा निर्णय घेत एव्हरेस्ट आणि एमडीएच मसालाबाबत आपली भूमिका कडक केली आहे.

नेपाळने एव्हरेस्ट आणि एमडीएच मसाल्यांच्या वापरावर आणि आयातीवरही बंदी घालण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार,  या मसाल्यांमध्ये कीटकनाशक इथिलीन ऑक्साईड असण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने मसाल्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

 नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभाग आता या मसाल्यांमध्ये केमिकल असण्याच्या शक्यतेबाबतही चौकशी करत आहे.

नेपाळच्या अन्न विभागाच्या प्रवक्त्यानुसार, एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. आता हे मसाले बाजारात विकता येणार नाहीत. या मसाल्यांमध्ये घातक रसायने सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर ही बंदी घालण्यात आली आहे. या मसाल्यांमधील रसायनांचा शोध घेण्यात येत आहे. अहवाल येईपर्यंत बंदी कायम राहणार आहे.

ब्रिटनमध्येही तपास सुरू 

आता ब्रिटननेही एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांमध्ये आढळणाऱ्या कीटकनाशकांवर कडक कारवाई केली आहे. या मसाल्यांची चौकशी सुरू आहे.

Leave a Comment