Mayawati On India Alliance : I.N.D.i.A. आघाडीला धक्का! मायावतींची मोठी घोषणा; अनेक चर्चांना उधाण

Mayawati On India Alliance :  आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा I.N.D.i.A. आघाडीला मोठा धक्का बसला आहे. देशाच्या राजकारणात सर्वात महत्वाचा आणि मोठा राज्य असणारा उत्तर प्रदेशमध्ये I.N.D.i.A. आघाडीला हा धक्का लागला आहे.

राज्याची माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्ष प्रमुख मायावती यांनी मोठी घोषणा करत  I.N.D.i.A. आघाडीशी युती होणार नसल्याची माहिती दिली आहे. मायावती यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Tata Motors ची मोठी घोषणा, ‘या’ इलेक्ट्रिक कारवर मिळणार तब्बल 3 लाख रुपयांपेक्षा जास्त सूट

हे जाणून घ्या कि, देशाच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून  मायावती आणि बसपाबाबत विविध प्रकारच्या अटकळ बांधल्या जात होत्या. चर्चा अशी होती कि, मायावती अजूनही काँग्रेसच्या संपर्कात असून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसशी युती करू शकते मात्र आता लोकसभा निवडणुकीत बसपा कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती करणार नसल्याचे बसपा प्रमुखांनी स्पष्ट केले.

बसपा सुप्रीमो मायावती यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर लिहिले की, ‘बसपा संपूर्ण तयारी आणि ताकदीने देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणुका एकट्याने लढत आहे. अशा स्थितीत निवडणूक युती किंवा तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या अफवा पसरवणे म्हणजे चुकीच्या बातम्या आहे.

अशा खोडसाळ बातम्या देऊन मीडियाने आपली विश्वासार्हता गमावू नये. लोकांनीही काळजी घ्यावी. त्यांनी पुढे लिहिले – ‘विशेषत: यूपीमध्ये बसपा मोठ्या ताकदीने एकट्याने निवडणूक लढवत असल्याने विरोधक खूपच अस्वस्थ दिसत आहेत.

नमाज अदा करणाऱ्यांना पोलिसाने मारली लाथ, करण्यात आलं निलंबित

त्यामुळेच ते दररोज विविध प्रकारच्या अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र बहुजन समाजाच्या हितासाठी एकट्याने निवडणूक लढविण्याच्या बसपाच्या निर्णयावर ठाम आहे.

Leave a Comment