पुणे : सध्यातरी मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी आहे. परिणामी मारुतीच्या कारसाठी ग्राहकांना बराच वेळ वेटिंग करावी लागते. कंपनीकडे अशा भरपूर गाड्या आहेत ज्याचा वेटिंग पिरीयड मोठा आहे. मात्र, कंपनी ही समस्या आता सोडवणार आहे. भविष्यात मारुती सुझुकी कंपनीकडे एखाद्या व्यक्तीने कारचे बुकिंग केले तर त्यासाठी त्याला नवीन कारच्या डिलिव्हरीसाठी जास्त वेळ थांबावे लागणार नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार आता सध्या कंपनीकडे 3.9 लाख कार देण्याचा अनुशेष बाकी आहे. बरेच लोक वाट पाहून त्यांचे बुकिंग रद्द करत आहेत. यामुळेच भविष्यात अशी समस्या उद्भवू नये यासाठी कंपनीने खास योजना तयार केली आहे. या योजनेनुसार कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता आर्थिक वर्ष 2024 पर्यंत 24 लाख युनिटपर्यंत पोहोचवायची आहे. बिझनेस स्टँडर्डच्या बातमीनुसार मारुती सुझुकीचे अध्यक्ष आरसी भार्गव यांच्या वतीने हे सांगण्यात आले आहे. मानेसर आणि गुजरातचे प्लांट आहेत, त्याची उत्पादन क्षमता 7 लाख 50 हजार युनिट्स आणि गुरुग्राम प्लांटमध्ये 5 लाख आहे.
गुजरात प्लांटमध्ये उत्पादन 8 लाख 50 हजार कार युनिटपर्यंत वाढवायचे आहे. यासोबतच गुरुग्राममध्ये उत्पादन क्षमताही वाढवली जाईल. अशा प्रकारे आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीची उत्पादन क्षमता तब्बल 23 ते 24 लाख युनिटपर्यंत पोहोचेल. मारुती सुझुकीची मूळ कंपनी सुझुकी मोटर आहे.
म्हणून होतोय बँक संप; पहा किती दिवस सेवा बाधित होणार, आणि कशासाठी..
Canara bank finance बाबत घेतलाय ‘तो’ महत्वाचा निर्णय; पहा काय होणार परिणाम