Maruti Swift VS Tata Nexon : टाटाची ‘ही’ नवीन कार देणार स्विफ्टला टक्कर, जाणून घ्या खासियत आणि किंमत

Maruti Swift VS Tata Nexon : सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती खूप वाढल्या आहेत. वाढत्या किमतींमुळे लोक सीएनजी वाहनांना पसंती देत ​​आहेत. बाजारात नुकतीच मारुती स्विफ्ट झेड सिरीज लॉन्च केली आहे. त्याचे सीएनजी इंजिनही येणार आहे. ही कार टाटा नेक्सॉन सीएनजीशी कडवी टक्कर देईल.

मिळेल जबरदस्त इंजिन

किमतीचा विचार केला तर नवीन स्विफ्ट 6.49 लाख रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत सादर केली आहे. या कारमध्ये शक्तिशाली 1.2-लिटर इंजिन आहे. ही कार उच्च पिकअप देत असून यात तीन-सिलेंडर इंजिन दिले आहे. नवीन कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

ही कार 82hp पॉवर आणि 112Nm टॉर्क निर्माण करते. तर या शानदार कारमध्ये सुरक्षेसाठी 6 एअरबॅग आणि इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रणाचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच या कारमध्ये टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.

Nexon मध्ये मिळतील दोन CNG सिलेंडर

नेक्सॉन सीएनजीला दोन सीएनजी सिलिंडर मिळत असून या कारला सुमारे 300 लिटरची मोठी बूट स्पेस मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर कंपनी 27 जून रोजी आपला Nexon CNG सादर करेल. या कारमध्ये शक्तिशाली 1.2-लिटर इंजिन पर्याय दिला आहे. या कारच्या टॉप व्हेरियंटमध्ये अलॉय व्हील्स आणि ड्युअल कलरचा पर्याय असून Nexon कडे पेट्रोल आणि EV इंजिन दोन्ही पर्याय बाजारात आहेत. कंपनीची ही पाच सीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार आहे.

6 स्पीड गिअरबॉक्स आणि सहा एअरबॅग्ज

Nexon CNG इंजिन 100 bhp पॉवर आणि 150 Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. या कारमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स, सहा एअरबॅग्ज आणि प्रगत सुरक्षा फीचर्स मिळतील. या टाटा कारमध्ये 2 स्पोक मल्टी फंक्शनल स्टीयरिंग व्हील आणि 10.25 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे.

Leave a Comment