Maruti Suzuki Car: सणासुदीच्या हंगामापूर्वी तुम्ही जर नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी ऑक्टोबर महिन्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बंपर सूट देत आहे.
या महिन्यात तूम्ही मारूती सुझुकीची नवीन कार खरेदी करुन हजारो रुपयांची बचत करु शकता. चला मग जाणून घेऊया तुम्ही या महिन्यात कोणत्या कार्स अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये घरी आणू शकता.
मारुती सियाझ
सध्या बाजारात मारूतीची लोकप्रिय कार मारुती सियाझ होंडा सिटीला टक्कर देताना दिसत आहे. या कारमध्ये तुम्हाला 1.5 लिटर पेट्रोल इंजिन पाहायला मिळतो.
हे इंजिन 103 पीएस पॉवर आणि 138 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. बाजारात ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गियर बॉक्ससह उपलब्ध आहे.
ही कार तुम्हाला 20 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. कंपनी या कारवर 53000 रुपयांची ऑफर देत आहे.
मारुती इग्निस
बाजारात मारूतीची ही लोकप्रिय कार व्हॅल्यू फॉर मनी म्हणून ओळखली जाते.
या कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे जाणुन घ्या या इंजिनमध्ये 83 पीएस पॉवर आणि 113 न्यूटन मीटरचा टॉर्क निर्माण करण्याची क्षमता आहे. ही कार देखील तुम्हाला 20 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. ऑक्टोबर महिन्यात 60000 रूपयांची सूट मिळत आहे.
मारुती बलेनो
देशाची सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक कार मारुती बलेनो आहे. या कारमध्ये तुम्हाला 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.
या इंजिनच्या मदतीने ते 90 पीएस पॉवर आणि 113 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. तुम्हाला फाइव्ह स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्सचा पर्यायही मिळेल. ही कार तुम्हाला 22 किलोमीटर प्रति लिटर एवढा मायलेजही देते.
या करावर 40000 रुपयांची सूट दिली जात आहे. त्याच्या CNG मॉडेलवर 55000 रुपयांची सूट असेल.