Maruti Suzuki Eeco : 20kmpl मायलेज असणाऱ्या या स्वस्त 7 सीटर कारवर मिळतेय मोठी सवलत, पहा ऑफर

Maruti Suzuki Eeco : जर तुम्हाला नवीन 7 सीटर कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला आता मारुती सुझुकीच्या कारवर सर्वात मोठी सवलत मिळेल. विशेष म्हणजे कंपनीच्या या कारमध्ये 20kmpl मायलेज आणि शानदार फीचर्स उपलब्ध करून दिली आहेत.

मारुती Suzuki Eeco वर मिळतेय हजारोंची सवलत

मारुती Suzuki या मे महिन्यात Eeco तुम्हाला 20 हजार रुपयांची शानदार सवलत देत आहे. यात रोख सूट 10,000 रुपये आहे आणि एक्सचेंज ऑफर 10,000 रुपये आहे म्हणजेच तुमची एकूण बचत 20,000 रुपये इतकी असणार आहे. किमतीचा विचार केला तर Eeco ची एक्स-शोरूम किंमत 5.33 लाख रुपयांपासून सुरू होते. पण हे लक्षात घ्या की ही सवलत 31 मे पर्यंतच लागू असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर कंपनीची कार खरेदी करावी लागणार आहे. जाणून घेऊया या कारची फीचर्स.

मिळेल जबरदस्त इंजिन आणि पॉवर

भारतीय बाजारात कमी किंमत आणि उत्कृष्ट मायलेज यामुळे मारुती ईकोला खूप मागणी आहे. ही भारतातील सर्वात जास्त विक्री होणारी कार कारमध्ये 7 लोकांपर्यंत बसण्याची क्षमता आहे. 1.2L पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे जे 80.76 PS पॉवर आणि 104.4 Nm टॉर्क निर्माण करते. तर या कारच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर Eeco पेट्रोल मोडवर 20kmpl चे मायलेज देते तर CNG मोडवर ते 27 km/kg मायलेज देते.

Eeco मध्ये 13 प्रकार उपलब्ध असून कारमध्ये 5 सीटर आणि 7 सीटर पर्याय दिले आहेत. वैयक्तिक वापराव्यतिरिक्त, ते रुग्णवाहिकेत देखील वापरले जाऊ शकते. सुरक्षेसाठी, यात 2 एअरबॅग, ABS + EBD, चाइल्ड लॉक, स्लाइडिंग दरवाजे आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर सारखी शानदार फीचर्स देण्यात आली आहेत.

Leave a Comment