Maruti Suzuki Discount: जर तुम्ही मे 2023 मध्ये नवीन कार खरेदी करणार असाल तर मारुती सुझुकी तुम्हाला मे 2023 मध्ये नवीन कार खरेदीवर बम्पर डिस्काउंट देत आहे.
तुम्ही या संधीचा फायदा घेत कमी किमतीमध्ये मारुती सुझुकीची नवीन कार खरेदी करू शकतात. चला तर जाणून घेऊया कोणत्या कारवर किती डिस्काउंट मिळत आहे.
Maruti Alto 800
मारुती डिस्काउंट मे 2023 ऑफरमध्ये पाहिले तर, कंपनीने अल्टो 800 च्या एक्सचेंजवर 15000 दिले आहेत तर कंपनीकडून Alto 800 च्या नवीन मॉडेलवर 40000 ग्राहक ऑफर आणि 15000 एक्सचेंज ऑफर आणि कार प्रेमींना 4000 SPL ऑफर दिली जात आहे.
Maruti S-Presso
कंपनीचे एस प्रेसो मॉडेल्स 35,000 रुपयांची ग्राहक ऑफर, 15,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 4,000 रुपयांची स्पेशल इंस्टीट्यूशनल सेल्स ऑफर म्हणून दिली जात आहेत. प्रेसो मॉडेलच्या AMT आणि CNG व्हेरियंटसाठी ऑफर देण्यात आल्या आहेत.
AMT बद्दल बोलायचे झाल्यास, एक्सचेंज ऑफर म्हणून 15000, SPL ऑफर म्हणून 4000, CNG व्हेरियंटसाठी 25000 ऑफर आणि 15000 एक्सचेंज दिले जात आहेत.
Maruti WagonR
कंपनीच्या WagonR मॉडेलबद्दल बोलायचे झाल्यास, WagonR ऑफर 30,000 रुपये, SPM ऑफर 4,000 रुपये आणि एक्सचेंज ऑफर 20,000 रुपये आहे. त्याच वॅगन आर सीएनजी मॉडेलबद्दल बोलायचे झाल्यास, ऑफर रु.25000, एक्सचेंज ऑफर रु.20000 आणि SPL ऑफर रु.5000 आहे. दुसरीकडे,
WagonR च्या AMT मॉडेलबद्दल बोलायचे झाले तर, अनुक्रमे 20000 आणि 4000 च्या फक्त एक्सचेंज आणि SPL ऑफर आहेत.
Maruti Celerio
सेलेरियोचे दोन मॉडेल बाजारात विकले जात आहेत, ज्यामध्ये सेलेरियो सीएनजीची ऑफर रु. 20,000 आहे आणि एक्सचेंज ऑफर रु. 15,000 आहे.
दुसरीकडे, सेलेरियोसाठी 15,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 35,000 रुपयांची ऑफर आहे.