Maruti Suzuki Discount : जर तुम्हाला नवीन कार खरेदी करायची असेल तर तुम्ही आता हजारो रुपयांची बचत करू शकता. मारुतीने आपल्या कार्सवर ऑफर उपलब्ध करू दिली आहे. तुम्ही कंपनीच्या या ऑफरचा लाभ घेऊ शकता. पहा संपूर्ण ऑफर.
मारुती अल्टो K10 कार ऑफर
मारुती सुझुकी या महिन्यात आपल्या छोट्या कार Alto K10 वर 63,100 रुपयांची सवलत देत आहे. किमतीचा विचार केला तर या कारची किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू होते. तर यात 1000cc इंजिन देण्यात आले आहे. ही कार एका लिटरमध्ये 25km पर्यंत मायलेज देईल. या शानदार कारमध्ये 5 लोकांसाठी बसण्याची जागा उपलब्ध असून ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये, अल्टोला प्रौढ सुरक्षेमध्ये 2 स्टार आणि मुलांच्या सुरक्षिततेमध्ये शून्य ‘0’ स्टार मिळाले आहेत.
मारुती वॅगनआर ऑफर
Wagon R ही भारतात सर्वात जास्त विकली जाणारी हॅचबॅक कार आहे. या महिन्यात 68,100 रुपयांची सवलत मिळत आहे. या शानदार कारमध्ये 1.0L आणि 1.2L चे इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. किमतीबद्दल बोलायचे झाल्यास Wagon R ची किंमत 5.54 लाख रुपयांपासून सुरू होते. ही कार एका लिटरमध्ये 26 किमी मायलेज देते.
मारुती सेलेरियो कार ऑफर
मारुती सेलेरियो ही अतिशय स्टायलिश कार असून समजा तुम्ही या महिन्यात ती खरेदी केली तर तुम्हाला या कारवर 58,100 रुपयांची शानदार सवलत मिळेल. यात 1000cc चे पेट्रोल इंजिन आहे. ही कार एका लिटरमध्ये 26 किमी मायलेज देईल. किमतीबद्दल बोलायचे झाल्यास सेलेरियोची किंमत 5.36 लाख रुपयांपासून सुरू होते.
मारुती एस-प्रेसो कार ऑफर
या महिन्यात मारुती सुझुकीची मायक्रो एसयूव्ही एस-प्रेसो खरेदी केली तर तुम्हाला 58,100 रुपयांच्या सवलतीचा लाभ मिळू शकतो. किमतीबद्दल बोलायचे झाल्यास या कारची किंमत 4.26 लाख रुपयांपासून सुरू होते. तसेच यात तुम्हाला 1000cc इंजिन मिळेल. ही कार एका लिटरमध्ये 26 किमी मायलेज देते.