Maruti Suzuki Car Discount: बंपर डिस्काउंट! मारुती सुझुकीच्या ‘ह्या’ कार्स खरेदीवर होणार 80 हजारांची बचत

Maruti Suzuki Car Discount : देशाची सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि आपली विक्री आणखी वाढवण्यासाठी मार्च 2024 मध्ये जबरदस्त डिस्काउंट ऑफर देत आहे.

या डिस्काउंट ऑफरचा फायदा तुम्ही बाजारात धुमाकूळ घालणाऱ्या मारुती सुझुकीच्या कार्स अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये घरी आणू शकतात. चला मग जाणून घेऊया मार्च 2024 मध्ये देशाची सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकी कोण कोणत्या कार्सवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर देत आहे.

Maruti Suzuki Ignis :  62,000 रुपयांपर्यंत सूट

मारुती सुझुकी मार्च 2024 मध्ये मारुती सुझुकी इग्निस या कारवर तब्बल 62,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. कंपनी मारुती सुझुकी इग्निसवर 1.2-लिटर, 4-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह सर्वाधिक सवलत ऑफर देत आहे.

Hero HF Deluxe आता घरी आणता येणार फक्त 13 हजारात! असा घ्या फायदा

खरेदीदार 40,000 रुपयांची रोख सवलत, 7,000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनस आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळवू शकतात. एकूणच, हे फायदे 62,000 रुपये आहेत.

Maruti Suzuki Ciaz : Rs 57,000 पर्यंत सूट

तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीकडून  मारूती सुझुकी सियाझवर देखील जबरदस्त ऑफर देण्यात येत आहे. ग्राहक या ऑफर अंतर्गत 25,000 रुपयांची रोख सवलत, 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि सूचीतील इतर सर्व मॉडेल्सप्रमाणे 7,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट प्राप्त करू शकतात.

Maruti Suzuki Jimny : 50,000 रुपयांपर्यंत सूट

महिंद्रा थारला टक्कर देणारी मारुती सुझुकीची ऑफरोड SUV कार मारुती सुझुकी जिमनीवर देखील ऑफर उपलब्ध आहे. या ऑफर अंतर्गत कंपनी Zeta आणि Alpha या दोन ट्रिमवर 50,000 रुपयांच्या रोख सवलत देत आहे.

Home Loan सहज मिळणार! फॉलो करा ‘ही’ पद्धत; होणार फायदा

Maruti Suzuki Grand Vitara :  80,000 रुपयांपर्यंत सूट

मार्च 2024 मध्ये मारुती सुझुकी सर्वात जास्त ऑफर लोकप्रिय कार ग्रँड विटारावर देत आहे. कंपनी या कारच्या माईड हायब्रीड व्हेरियंटवर 25,000 ची रोख सवलत आणि रु. 30,000 चे एक्सचेंज बोनस देत आहे. तर  स्ट्राँग हायब्रिड ट्रिमवर 50,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनससह 30,000 रुपयांची अपफ्रंट सूट ग्राहकांना मिळत आहे.

Leave a Comment