Maruti FRONX Velocity Edition : सर्वाधिक विक्री होते मारुतीची ‘ही’ कार, किंमत 7.29 लाखांपासून सुरु

Maruti FRONX Velocity Edition : मारुती सुझुकीकडे सर्व प्रकारच्या कार आहेत. कंपनी ग्राहकांच्या गरजेनुसार बाजारात कार लाँच करत असते. कंपनीची मारुती फ्रॉन्क्स व्हेलॉसिटी एडिशन ही सर्वात जास्त विक्री करणारी कार आहे. जी आता सर्व प्रकारांमध्ये उपलब्ध असेल.

जबरदस्त इंजिन आणि पॉवर

FRONX मध्ये 1.0L पेट्रोल इंजिन आहे ज्यात स्मार्ट हायब्रीड तंत्रज्ञानाचा समावेश आहे. इतकेच नाही तर या कारमध्ये 1.2L K-Series Advanced Dual Jet, Dual VVT पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड AGS गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. इतकेच नाही तर ते स्टार्ट स्टॉप तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. तसेच हे वाहन सीएनजी पर्यायामध्येही उपलब्ध आहे. हे लक्षात घ्या की कार CNG मोडवर 28.51 किलोमीटर आहे.

जाणून घ्या फीचर्स

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात हेडअप डिस्प्ले आहे. यात टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, 360 डिग्री कॅमेरा आणि 9 इंच एचडी स्मार्ट प्ले प्रो प्लस इन्फोटेनमेंट सिस्टम पाहायला मिळेल आणि ते वायर्ड ऍपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटीने सुसज्ज आहे. या शानदार कारमध्ये जागा चांगली आहे.

कारमध्ये 5 जणांच्या बसण्याची जागा आहे. FRONX ची लांबी 3995 मिमी, रुंदी 1765 मिमी, उंची 1550 मिमी इतकी आहे. कंपनीच्या या कारमध्ये 308 लीटर बूट स्पेस आहे. विक्रीचा विचार केला तर लॉन्चच्या 10 महिन्यांत FRONX चे 1 लाख युनिट्स विकले गेले. 2024 च्या आर्थिक वर्षाबद्दल बोलायचे झाले तर FRONX ची 1,34,735 वाहने विकली गेली आहेत.

Leave a Comment