Maruti Fronx : कमी किमतीत खरेदी करता येईल जबरदस्त मायलेज देणारी कार, जाणून घ्या फीचर्स

Maruti Fronx : भारतीय बाजारात मारुती आपल्या अनेक शानदार कार्स लाँच करत असते. या कारमध्ये कंपनी अनेक शानदार फीचर्स देखील देत असते. त्यामुळेच कंपनीच्या जवळपास सर्वच कार्सना बाजारात चांगली मागणी असते. तुम्ही आता कंपनीची एक कार कमी किमतीत खरेदी करू शकता.

मिळेल सर्वात जास्त मायलेज

ही कार पेट्रोल इंजिन 20.01 kmpl आणि CNG इंजिन 28.51km/kg मायलेज देईल असा कंपनीचा दावा आहे. कंपनी या डॅशिंग कारमध्ये 998 cc ते 1197 cc पर्यंतचे इंजिन देत असून मारुती फ्रॉन्क्सला 9-इंच स्मार्ट प्ले प्रो इंफोटेनमेंट सिस्टम आणि टॉप व्हेरियंटमध्ये अलॉय व्हील मिळतात. कंपनीची कार हिल होल्ड असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल यासारख्या प्रगत फीचरसह येते. किमतीचा विचार केला तर कारचे बेस मॉडेल 9.01 लाख रुपये ऑन रोड उपलब्ध आहे.

हाय पॉवर Z सीरिज इंजिन

या कारचे शक्तिशाली Z सीरीज इंजिन ८२ एचपी पॉवर आणि ११२ एनएम टॉर्क जनरेट करते. यामध्ये ऑटो एसी आणि क्रूझ कंट्रोलची सुविधा दिली आहे. कारमध्ये डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले दिला आहे. या कारमध्ये मागील सीटवर मुलांच्या सुरक्षेसाठी चाइल्ड अँकरेजचे फीचर्स उपलब्ध करून दिली आहे. कारमध्ये हेड-अप डिस्प्ले आणि स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटीचे फीचर्स दिले आहे.

मिळतील शानदार फीचर्स

  • कारमध्ये मॅन्युअल आणि स्वयंचलित ट्रांसमिशन
  • मागील सीटवर मिळेल एसी व्हेंट
  • 3-पॉइंट सीट बेल्ट आणि रीअरव्ह्यू मिरर
  • 360 डिग्री कॅमेरा आणि ऑटो हेडलॅम्प
  • इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण
  • जलद यूएसबी चार्जिंग सॉकेट
  • 190 मिमी ग्राउंड क्लीयरन्स
  • वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay
  • 5 प्रकार आणि 16 इंच अलॉय व्हील

Leave a Comment