Maruti Ertiga : कार खरेदी करण्यामागे अनेकांचे वेगळे हेतू असतात. त्यामुळे लोक वर्षभर अगोदर कार खरेदीची तयारी करत असतात.
अनेकांना फक्त 5 सीटर नाही तर 7 सीटरपर्यंतची कार खरेदी करायची असते ज्यामुळे तिचा वापर टूर आणि ट्रॅव्हल्ससोबत कमाईचे साधन म्हणून करता येईल.
मार्केटमधील एमपीव्ही सेगमेंट खूप मोठा आहे. तुम्ही वर्षानुवर्षे राज्य करणाऱ्या मारुती सुझुकीच्या मारुती एर्टिगा खरेदी करू शकता. जे तुम्हाला मजबूत मायलेजसह वर्षानुवर्षे चांगली सर्व्हिस देते.
किती आहे किंमत?
मारुतीची अर्टिगा बजेट MPV सेगमेंटमध्ये येते, ज्यामुळे त्याची Ertiga मधील एक्स-शोरूम किंमत 8.64 लाख ते 13.08 लाख रुपयादरम्यान आहे.
इंजिन आणि गिअरबॉक्स
कंपनीने या कारमध्ये 1.5-लीटर K15C स्मार्ट हायब्रिड पेट्रोल इंजिन दिले आहे जे जास्तीत जास्त 102bhp पॉवर आणि 136.8Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. हे इंजिन कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये पाहायला मिळेल.
या कारचे सीएनजी व्हेरियंट जास्त खरेदी करतात, त्यामुळे ती 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये उपलब्ध करून दिली आहे. सीएनजी मोडमध्ये ही कार 87bhp पॉवर आणि 121.5Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. .
पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही पर्यायांमध्ये कंपनी या शानदार कारची विक्री करत आहे, पेट्रोलचे मायलेज 20.3 kmpl आहे तर CNG मध्ये ते तुम्हाला 26.11 किमी/किलो इतके मायलेज आहे.
Maruti Ertiga फीचर्स
Ertiga ला Android Auto आणि Apple CarPlay, पॅडल शिफ्टर्स आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसाठी समर्थन असणारी नवीन 7-इंचाची स्मार्टप्ले प्रो टचस्क्रीन इन्फोटेनमेंट प्रणाली देण्यात आली आहे. तसेच यामध्ये क्रूझ कंट्रोल, ऑटो हेडलॅम्प्स आणि ऑटो एसीशिवाय इतर अनेक शानदार फीचर्स पाहायला मिळतात.
इतकेच नाही तर सेफ्टी फीचर्समध्ये EBD सह ABS, ड्युअल एअरबॅग्ज, रियर पार्किंग सेन्सर्स, ब्रेक असिस्ट आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज यांचा समावेश करण्यात आला आहे.