Maruti Dzire 2024 : भारतीय बाजारात लवकरच मारुतीची नवीन डिझायर लाँच होणार आहे. कारमध्ये 3 सिलेंडर इंजिनसह 25km पेक्षा जास्त मायलेज मिळेल. तुमच्यासाठी ही एक उत्तम कार असणार आहे.
मिळेल 3 सिलेंडर इंजिन
मारुती नवीन Dezire मध्ये Z-Series चे 3 सिलेंडर इंजिन मिळेल. सध्याच्या स्विफ्टमध्ये हेच इंजिन बसवले असून जे ८२ एचपी पॉवर आणि ११२ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एएमटी गिअरबॉक्सने सुसज्ज असून डिझायर बसवल्यानंतर या इंजिनच्या पॉवर आणि टॉर्कमध्ये थोडासा बदल होईल. या इंजिनमधून अधिक चांगल्या मायलेजचा दावा कंपनीकडून केला जात आहे.
डिझाइन
असे सांगितले जात आहे की यावेळी नवीन डिझायरच्या डिझाइनमध्ये बरेच मोठे बदल केले जातील. यात नवीन ग्रिल, बोनेट, बंपर, हेडलाइट्स आणि टेललाइट्स मिळतील. कारचा आकार 4 मीटरपेक्षा कमी असेल. सूत्रानुसार, कारच्या फ्रंट लूकमध्ये नवीन स्विफ्टची झलक पाहायला मिळेल.
आजकाल 4 सिलिंडर इंजिनांऐवजी 3 सिलिंडर इंजिन नवीन गाड्यांमध्ये दिसत असून कारण ही इंजिने जास्त पॉवर देतात आणि चांगले मायलेजही देतात. एक सिलेंडर कमी केले असल्याने इंजिनचा आकार लहान होतो आणि खर्च देखील कमी होतो, ज्यामुळे कारची किंमत थोडी कमी होते. या कारमध्ये उत्तम मायलेजही मिळेल.
सीएनजी प्रकार
नवीन डिझायर पेट्रोल इंजिनमध्ये येईल पण लवकरच त्यात सीएनजीचा पर्याय मिळेल. ही कार 25kmpl पेक्षा जास्त मायलेज ददेईल. नवीन Dezire मध्ये 378 लीटरची मोठी बूट स्पेस असणार आहे. नवीन स्विफ्टची एक झलक तिच्या समोर आणि आतील भागात पाहिली जाईल. असे सांगण्यात येत आहे की नवीन मॉडेलची किंमत सध्याच्या मॉडेल (Dezire) पेक्षा थोडी जास्त असेल. सध्याच्या Dezire ची एक्स-शोरूम किंमत 6.56 लाख रुपयांपासून सुरू होते.