Maruti Discount Offers: ऑगस्ट 2023 मध्ये तूम्ही नवीन कार खरेदी करणार असाल तर हे जाणुन घ्या देशाची नंबर 1 ऑटो कंपनी मारूती सुझुकीने एक शानदार ऑफर जाहीर केली आहे.
तूम्ही या ऑफर अंतर्गत आता तुमची आवडती कार बंपर डिस्काउंट घरी आणू शकतात. या डिस्काउंट ऑफरमध्ये तुम्हाला मारुतीच्या नेक्सा डीलरशिपवर विकल्या जाणाऱ्या कार खरेदी करता येणार आहे.
Maruti Discount Offers 2023
Maruti Baleno
मारुतीची लोकप्रिय हॅचबॅक कार मारुती बलेनो तूम्ही या ऑफर अंतर्गत 30 हजारांच्या डिस्काउंट खरेदी करू शकतात.
या कारमध्ये तुम्हाला मॅन्युअल, ऑटोमॅटिक आणि सीएनजी हे तिन्ही ट्रान्समिशन मिळतात. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6,61,000 आहे. त्याच वेळी त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 9 लाख 88 हजार रुपये आहे. यात 1.2-लिटर के-सीरीज पेट्रोल इंजिन पाच-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
Maruti Ignis
Maruti Ignis वर या ऑफर अंतर्गत मारुतीकडून 64000 हजारांची सूट दिली जात आहे. तुम्हाला ही सवलत एक्सचेंज कॉर्पोरेट डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंटच्या स्वरूपात मिळेल. तुम्ही त्याचे मॅन्युअल व्हेरियंट विकत घेतल्यास त्यावर ₹ 54000 ची सूट मिळेल. त्याची किंमत ₹ 5.84 लाखांपासून सुरू होते आणि ₹ 8.16 लाखांपर्यंत जाते.
Maruti Ciaz
मारुतीची सर्वात प्रीमियम सेडान Maruti Ciaz वर 48,000 ची सूट दिली जात आहे. तुम्ही आता शोरूममधून खरेदी करायला गेलात, तर तुम्हाला ते 9.30 लाख ते 12.29 हजार रुपयांपर्यंत मिळेल. यात 1.5-लिटर K15 स्मार्ट हायब्रिड पेट्रोल इंजिन आहे.
या इंजिनमध्ये 103 bhp पॉवर जनरेट करण्याची क्षमता आहे. म्हणुन तूम्ही या संधीचा फायदा घेत तुमच्यासाठी एक शानदार कार कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात.