Maruti cars price : कारप्रेमींसाठी आनंदाची बातमी! स्वस्तात खरेदी करता येणार मारुतीच्या ‘या’ वाहनांच्या किमती

Maruti cars price : जर तुम्ही नवीन कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला आता स्वस्तात मारुतीच्या कार्स खरेदी करता येईल. यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल. जाणून घ्या सविस्तर माहिती.

Brezza आणि Ertiga वर मिळणार नाही सवलत

या सर्व वाहनांच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या किमती 5000 रुपयांनी कमी केल्या आहेत. या सर्व जास्त विक्री होणाऱ्या गाड्या असून इग्निस सोडून या सर्व गाड्यांमध्ये सीएनजी इंजिन उपलब्ध आहे. ज्या वाहनांची किंमत कमी केली आहे, ती सर्व नेक्सा आणि एरिना डीलरशिपवर विकण्यात येत आहेत. हे लक्षात घ्या की कंपनी सध्या त्यांच्या नवीन Swift, Brezza, Ertiga, XL6, Invicto, Grand Vitara, Jimny आणि Ciaz वर कोणतीही सवलत देत नाही.

‘या’ वाहनांमध्ये मिळेल जास्त मायलेज

मागील वर्षी मारुती सुझुकीने गेल्या वर्षी एकूण 1.32 लाख ऑटोमॅटिक वाहनांची विक्री केली होती. मारुती आपल्या वाहनांमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देत असून मॅन्युअल ट्रान्समिशनपेक्षा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑपरेट करणे कमी कंटाळवाणे असते. हे लक्षात घ्या की मॅन्युअल ट्रान्समिशन कार ऑटोमॅटिक कारपेक्षा सर्वात जास्त मायलेज देतात.

वॅगन आरमध्ये मिळतील आठ रंग पर्याय

कंपनीच्या Wagon R बद्दल बोलायचे झाल्यास ही सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक असून यात 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. ही कार सीएनजीमध्येही खरेदी करता येईल. नवीन पिढीसाठी कारमध्ये आठ रंगांचे पर्याय उपलब्ध असून एप्रिल 2024 मध्ये मारुती वॅगन आरच्या एकूण 17,850 युनिट्सची विक्री झाली.

मिळेल हाय पॉवर

कार 90 PS पॉवर आणि 89 Nm टॉर्क जनरेट करत असून यात ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल असे दोन ट्रान्समिशन आहेत. किमतीचा विचार केला तर कंपनी ही 5 सीटर कार ऑन रोड 6.70 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत देत आहे. या कारचे पेट्रोल इंजिन 25.19 kmpl पर्यंत मायलेज देते.

Leave a Comment