Market Updates : बेंचमार्क निर्देशांक (Benchmark indices) १ नोव्हेंबर रोजी सलग चौथ्या सत्रात निफ्टी (Nifty) १८,१०० च्या वर बंद झाले. बंद होताना, सेन्सेक्स (Sensex) ३७४.७६ अंकांनी (०.६२%) वर ६१,१२१.३५ वर होता आणि निफ्टी १३३.२० अंकांनी (०.७४%) वर १८,१४५.४० वर होता. आजच्या सत्रात सुमारे १७६५ शेअर्स (Shares) वाढले आहेत, १५७९ शेअर्समध्ये घट झाली आहे आणि १२९ शेअर्स अपरिवर्तित (Unchanged) आहेत.

अदानी एंटरप्रायझेस (Adani Enterprises), डिव्हिस लॅब्स (Divis Labs), एनटीपीसी (NTPC), पॉवर ग्रिड कॉर्प (Power Grid Corp) आणि ग्रासिम इंडस्ट्रीज (Grasim Industries) हे शेअर्स निफ्टीमध्ये आघाडीवर ( Nifty Gaineers) आहेत, तर अॅक्सिस बँक (Axis Bank), यूपीएल (UPL), आयशर मोटर्स (Eicher Motors), रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) आणि मारुती सुझुकी (Maruti Suzuki) यांचा आजच्या सत्रात निफ्टीमध्ये पडणाऱ्यां (Nifty Losers) शेअर्सच्या यादीमध्ये समावेश आहे.
क्षेत्रांमध्ये (sectors), पॉवर (Power), मेटल (Metal), फार्मा आणि माहिती तंत्रज्ञान (Pharma and Information Technology) निर्देशांक प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले, तर रियल्टी निर्देशांक (Realty index) १ टक्क्यांनी वाढले.
बीएसई मिडकॅप निर्देशांक (BSE Midcap index) १ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक (Smallcap index) ०.२६ टक्क्यांनी वधारला. ८२.७७ च्या मागील बंदच्या तुलनेत भारतीय रुपया(Indian rupee) प्रति डॉलर (Per dollar) ८२.७० वर बंद झाला.

अमेरिकेत फेडची बैठक सुरू झाली
जागतिक बाजारातील (global markets) सकारात्मक संकेतांमुळे (Positive Signs) भारतीय बाजार (Indian market) मंगळवारी दिसून आले. फेडरल रिझर्व्हची (Federal reserve) महत्त्वाची बैठक सुरू झाली असून २ नोव्हेंबरला व्याजदर (Interest rate) जाहीर होणार आहेत. भारतीय बाजारातील एफआयआयचा (FII’s) कल मंगळवारी सकारात्मक (Positive) दिसून आला.
परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी (Foreign institutional investors) गेल्या सहा सत्रांमध्ये भारतीय समभागांमध्ये (Indian stocks) १ अब्ज डॉलरची खरेदी केली आहे आणि यूएस फेडरल रिझव्‍‌र्ह (US Federal Reserve rate) रेट वाढ करण्याच्या दिशेने पाऊल उचलत असून बाजारात खरेदीचा वेग कायम असू शकेल, असे विश्लेषकांचे मत आहे.

Share.

Leave A Reply

Exit mobile version