Market Closing : दिवाळीनंतर शेअर बाजारातील (Stock market) वाढीचा कल कायम असताना मंगळवारी सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या (American Dollar) तुलनेत रुपया (Indian Rupee) २६ पैशांनी वाढून ८२.६२ वर पोहोचला होता. आज मार्केट (Market) बंद झाले तेव्हा भारतीय बेंचमार्क निर्देशांकांनी (Indian benchmark Indices) सात दिवसांचा वाढता सिलसिला तुटला.
- Demat News : बाबो.. एवढ्या लोकांनी २०२२ मध्ये उघडली डिमॅट खाती
- Samvat 2079 : या वर्षात भारतीय शेअर बाजार सगळ्यांना टाकणार मागे
- Banking News : म्हणून ‘त्या’ बँकेचा निव्वळ नफा ३२.२ टक्क्यांवरून घसरला; पहा काय झालीय स्थिती
- Banking News : बाबो… “त्या” बँकेच्या नफ्यात झाली ३७ टक्क्यांनी वाढ
मार्केट बंद होताना, सेन्सेक्स (Sensex) २८७.७० अंकांनी म्हणजे ०.४८% घसरून ५९,५४३.९६ वर होता. निफ्टी (Nifty) ७४.५० अंकांनी किंवा ०.४२% घसरून १७,६५६.३० वर होता. आजच्या सत्रात सुमारे १३७८ शेअर्स (Shares) वाढले गेले तर १९५१ शेअर्समध्ये घट झाली. १०६ शेअर्स अपरिवर्तित (unchanged) आहेत.
नेस्ले इंडिया (Nestle India), एचयूएल (HUL), कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank), बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserve) आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज (Britania Industries) हे निफ्टीमध्ये (Nifty) सर्वाधिक नुकसान (Top Lossers) झालेले आजचे शेअर्स आहेत, तर टेक महिंद्रा (tech Mahindra), मारुती सुझुकी (Marui Suzuki), जेएसडब्ल्यू स्टील (JSW steel), लार्सन अँड टुब्रो (Larsen and turbo) आणि आयशर मोटर्स (Eicher Motors) यांचा सर्वाधिक वाढलेल्या (Top gainers)शेअरच्या यादीत समावेश होता.
क्षेत्रांमध्ये (Sector), पीएसयू बँक (PSU Bank) निर्देशांकात ३.५ टक्के आणि कॅपिटल गुड्स (Capital goods) आणि ऑटो निर्देशांकात (Auto indices) प्रत्येकी १ टक्के वाढ झाली, तर एफएमसीजी निर्देशांक (FMCG Indices) १ टक्क्यांनी घसरला. बीएसई मिडकॅप (BSE Midcap index) निर्देशांक ०.४ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक (Smallcap indices) ०.३ टक्क्यांनी घसरले. त्याचवेळी, आज १११ समभाग ५२ आठवड्यांच्या उच्च (52 Week high) पातळीवर बंद झाले आहेत. याशिवाय ३० समभाग त्यांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी (52 Week low)पातळीवर बंद झाले. याशिवाय आज २१० शेअर्समध्ये अप्पर सर्किट (Upper Circuit) आहे, तर १३९ शेअर्समध्ये लोअर सर्किट (Lower Circuit) आहे.
याशिवाय आज संध्याकाळी डॉलरच्या (Dollar) तुलनेत रुपया ५ पैशांच्या घसरणीसह ८२.७२ रुपयांवर ( Indian Rupee) बंद झाला.