Marathi Child stories| आटपाट नगरात एक होता उंदिरमामा. लैच खट्याळ आणि खोडकर. कोणाचीही खोड आणि चीड काढण्याची त्याला भारी मज्जा वाटायची. पण रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक हिरवे फडके. ते हिरवे फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. कशाला? अहो धुवायला की. धोब्याला म्हणाला ‘धोबीदादा,धोबीदादा माझे हे फडके धुवून दे की.’ धोब्याने ते हिरवे फडके धुवून दिले. मग उंदिरमामा गेला शिंप्याकडे. कशाला? अहो टोपी शिवायला की. ‘शिंपीदादा, शिंपीदादा मला एक छानशी टोपी शिवून दे आणि तिला रंगीत गोंडेही लाव दादा.’ शिंप्याने उंदिरमामाला खूप छान अशी सुरेख टोपी शिवून दिली. (Marathi story on rat and king)
खट्याळ उंदिरमामाने टोपी (rat cap) डोक्यावर घातली आणि एक ढोलके घेतले. ती ढोलकी वाजवत तो गाणे गाऊ लागला (rat sing a song). गावभर त्याचे गाणे घुमायला लागले. ते गाणे राजाला (king) खिजवणारे होते. ‘राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान.. छान.. ढुम, ढुम, ढुमक !’ हे ते गाणे होते. राजाने हे ऐकले. तो चिडला. शिपायांना राजा आदेश देत म्हणाला ‘जा रे, त्या उंदराला पकडून आणा.’ आदेशानुसार शिपायांनी जाऊन उंदिरमामाला पकडले आणि दरबारात आणले. शिपायांनी त्याची टोपी काढून राजाकडे दिली. तर मग उंदिरमामा म्हणतो कसा, ‘राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढुम, ढुम, ढुमक!!!’
हे ऐकून राजाला खूपच राग आला. त्याने घेतलेली टोपी उंदराकडे फेकून दिली. खट्याळ उंदिरमामाने ती टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला. आता गाणे काय होते माहित्येय का? ‘राजा मला भ्याला अन् माझी टोपी दिली. ढुम, ढुम, ढुमक !’ हे गाणे गात गात तो राजवाडयातून पळून जायला निघाला. पण राजाचे सैनिक सजग होते. त्यांनी उंदीर मामाच्या मुसक्या आवळल्या आणि तुरुंगात टाकले. खट्याळ व खोडकर म्हणून प्रसिद्ध असलेल्या उंदीर मामाला अशा पद्धतीने अतिहुशारी आणि मुजोरी दाखविण्याची शिक्षा मिळाली. म्हणूनच आपण आपल्या पद्धतीने राहावे, जगावे आणि ज्ञान घेऊन पुढे जावे. एखादे फडके सापडले म्हणजे आपण काही मोठे शहाणे होत नाहीत. त्यासाठी शिक्षण, अनुभव आणि पदाने मोठे व्हावे लागते.
तात्पर्य: अतिशहाणा त्याचा बैल रिकामा *(लहान मुलांसाठी नव्या पद्धतीने लिहिलेली ही गोष्ट कशी वाटली ते कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.)
🧞♀️ मुलांच्या विश्वातील रंजक घडामोडी, गोष्टी आणि शैक्षणिक माहिती वाचण्यासाठी ग्रुप जॉईन करा *(फक्त महिला पालक आणि मुलांनीच यामध्ये जॉईन व्हावे) https://chat.whatsapp.com/E5fNaC5mFPkLyDu2H9wnPd