अहमदनगर : सध्याचा कालखंड हा वैचारिक घुसळणीचा आहे. सोशल मिडीयाच्या प्रभावामुळे ‘वाचनात येणारी माहितीच सत्य वाटू लागते.’ मात्र, त्याची उलट तपासणी केली असता ती माहिती अनेकदा फसवी अथवा दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळेच अशा वैचारिक घुसळणीच्या काळात संत तुकाराम महाराजांच्या ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही.. न मानिले बहुमता..’ या उक्तीप्रमाणे कोणतीही माहिती ही तपासून पडताळणी केल्याखेरीज सत्य मानू नये. यासाठी लेखकांनी आग्रही असावे, असे मत पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिरीष लांडगे यांनी व्यक्त केले.
Diabetes Control: घरच्या घरी करा शुगर कंट्रोल; ‘या’ 3 पद्धतीचा करा वापर होणार मोठा फायदा https://t.co/ofWchWiW2A
— Krushirang (@krushirang) June 28, 2022
इसळक-निंबळक येथील राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी समितीच्या वतीने आयोजित नगर तालुका ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी मसाप शहर अध्यक्ष किशोर मरकड, लेखक व शिक्षक नेते संजय कळमकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माधवराव लामखडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार, स्वागताध्यक्ष लेखक रामदास कोतकर, सरपंच प्रियंका लामखडे, सरपंच छाया गेरंगे, समितीचे अध्यक्ष योगेश गेरंगे आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना डॉ. लांडगे म्हणाले की, साहित्यिकांनी वाचकांशी संवाद साधून आपल्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टींकडे डोळसपणे पाहण्याची आवश्यकता आहे. तरच साहित्यात ‘सत्य’ विचार उतरतील.
Rohit Sharma: BCCI देणार रोहीतला धक्का; ‘हा’ खेळाडू बनणार टीम इंडियाचा नवा कर्णधार https://t.co/UvDjqCnCZE
— Krushirang (@krushirang) June 28, 2022
पद्मश्री पोपटराव पवार यांनी ‘ग्रामीण साहित्याची चळवळ लोप पावत असतांना नगर तालुक्यात वाचन चळवळ टिकवण्यासाठी संमेलनाचे आयोजन केले, ही कौतुकाची बाब आहे’, असे गौरवोद्गार काढले. संजय कळमकर यांनी आपल्या खास विनोदी शैलीने उपस्थितांचे मनोरंजन केले. ते म्हणाले की, मोबाईलने तरुण पिढीचे कधीही न भरून निघणारे नुकसान केले आहे. पण, ह्याची कोणालाही जाणीव नाही. साहित्यातून शेतकरी, शेतमाल, बाजारभाव, आपल्या समस्या हद्दपार झाल्या आहेत. तसेच सध्याच्या राजकीय पेचावर टिप्पणी करतांना ‘विद्यार्थ्यांना वास्तवातील नागरिकशास्त्र शिकविण्याची गरज’ असल्याचे ते म्हणाले. आमदार सुधीर तांबे यांनी दुपारच्या सत्रात हजेरी लावली. प्रबोधनाचा विचार नेहमी तेवत ठेवला पाहिजे. त्यासाठी ग्रामीण भागात तालुकावार संमेलनाचे आयोजन करायला हवे. यासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, यासाठी आग्रही आहे. आगामी अधिवेशनात ही मागणी लावून धरणार असल्याचे, आमदार तांबे म्हणाले. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी राहुल ठाणगे, संदीप गेरंगे, महादेव गवळी, मच्छिंद्र म्हस्के, ज्ञानेश्वर गव्हाणे, राम बोराटे, अशोक घोरपडे, राजेंद्र खुंटाळे, संतोष घोलप, सुरज धामी, विनायक कोतकर, ज्ञानेश्वर आजबे आदींनी परिश्रम घेतले.
PM Kisan: पीएम किसानच्या लाभार्थ्यांना मोठा झटका! सरकारने बंद केली ‘ही’ मोठी सुविधा https://t.co/FRMMjRVvm3
— Krushirang (@krushirang) June 28, 2022
प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांच्या अभिनंदनाचा ठराव ! साहित्य अकादमीचा ‘भाषा सन्मान पुरस्कार’ अहमदनगर येथील सेवानिवृत्त प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांना जाहीर झाला. महादेव गवळी यांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. शिरीष लांडगे यांच्या संमतीने हा ठराव पारित झाला. (The current era is one of ideological turmoil. Due to the influence of social media, ‘only the information that comes in the reading becomes true.’ However, a cross-examination reveals that the information is often deceptive or misleading. That is why in the time of such ideological infiltration, according to Saint Tukaram Maharaj’s statement ‘Satya-asatyasi man kele gwahi .. na manile bahumata ..’, any information should not be considered true unless it is verified. Writers should be insistent for this, says Pvt. Dr. Expressed by Shirish Landage.
He was speaking in the presidential address of Nagar Taluka Gramin Sahitya Sammelan organized by Rajarshi Shahu Maharaj Smritishatabdi Samiti at Islak-Nimbalak.)
Eknath Shinde: ठरल…! एकनाथ शिंदे होणार उपमुख्यमंत्री तर ‘इतक्या’ आमदारांना मिळणार मंत्रीपद https://t.co/vx7YoNsLl7
— Krushirang (@krushirang) June 28, 2022
कवितांची रंगली मैफिल ! दुपारनंतरच्या सत्रात अध्यक्ष संतोष पवार यांच्या उपस्थितीत कवी संमेलन पार पडले. त्यांनी शाहू महाराजांवरील‘सत्यशोधकांची ललकारी’ ही कविता सादर केली. पोपट धामणे, सचिन चोभे, देविदास बुधवंत यांच्या कवितांनी लक्ष वेधले. सुभद्रासुत आंधळे यांच्या राजकीय भूकंप, योगेश गेरंगे यांची‘लग्न मातीचे, किसन आटोळे यांची ‘मला वाटतं आमदार व्हावं’, गीताराम नरवडे यांनी ‘तंटा’ ही कविता सादर केली. प्रा. प्राजक्ता ठुबे यांनी कवी संमेलनाचे सूत्रसंचालन केले.
Mahindra Scorpio-N किंमती जाहीर ; जाणून तुम्हीही होणार थक्क , जाणून घ्या फीचर्ससह संपूर्ण माहिती https://t.co/yAApkPkgXh
— Krushirang (@krushirang) June 28, 2022